शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: एसटी बसमधून डिझेलची चोरी, बंदुकीसह चोरट्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:47 IST

चोरी करत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात सापडला

दापोली : तालुक्यातील भडवळे शेरी भोईवाडी बसथांबा येथे उभ्या असलेल्या एसटी बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला दापोली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (२९ मार्च) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली.गौतम मनोहर रुखे (रा. दयाळ रुखेवाडी, खेड), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद एसटीचे वाहक निवृत्ती सखाराम पवार यांनी दिली आहे. त्यानुसार, त्यांची बस (एमएच २० बीएल १५३५) भडवळे गावी मुक्कामी होती. रात्रीच्या सुमारास गौतम रुखे हा कार (एमएच ०१ डीआर ३४५१) घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून पाइपच्या साहाय्याने डिझेल चोरण्यास सुरुवात केली. चोरी करत असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.पोलिसांनी त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता, त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेली एक १२ बोअरची सिंगल नळीची गावठी बनावटीची बंदूक आणि १२ बोअरचे जिवंत काडतूस सापडले. या कारवाईची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तोरसकर आणि पोलिस उपनिरीक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिस हवालदार अभिजित पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पूर्व इतिहास तपासणारयाप्रकरणी बीएनएस कलम ३०५ (बी) (इ) आणि शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ (१-ख) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपीचा कोणताही पूर्व इतिहास आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Diesel Theft from Bus, Thief Arrested with Gun

Web Summary : In Ratnagiri, a thief was caught red-handed stealing diesel from a bus in Dapoli. Police seized an illegal gun and ammunition. The suspect, Gautam Rukhe, faces charges under the Arms Act. Police are investigating his criminal history.