शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सतत पैशांची मागणी, शिवीगाळ अन् मानसिक छळ; विवाहितेने संपवले जीवन, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:54 IST

भावाची पोलिसांकडे फिर्याद

दापोली : तालुक्यातील जालगाव येथील एका २२ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींच्या त्रासाला व छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या भावाने दापाेली पाेलिस स्थानकात केली आहे. या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (मूळ रा. बलिया, झारखंड, सध्या रा. जालगाव दापाेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने १३ जून राेजी राहत्या घरी ओढणीच्या साहायाने गळफासाने आत्महत्या केली हाेती. तिचे पती बुराेंडी येथून कामावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला हाेता. याबाबत दापाेली पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती.मात्र, तिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ वीरेंद्रकुमार जनार्दन पंडा (वय ३४, रा. बलिया, झारखंड) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पिंकीदेवीला सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी, शिवीगाळ, धमकी आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. हा छळ ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पिंकीदेवीने आत्महत्या केल्याचे भावाने म्हटले आहे.भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती धर्मेंद्रकुमार धामिन, दीर राजेशकुमार धामिन, सासू (नाव माहीत नाही) आणि सासरे रामदेव धामिन यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (१), ३५१ (२), ३(५) अन्वये १६ जून राेजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील संशयित आराेपी धर्मेंद्रकुमार व राजेशकुमार हे सध्या जालगाव (ता. दापोली) येथे वास्तव्याला आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.