गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:54 IST2025-02-21T16:53:41+5:302025-02-21T16:54:08+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सचिन बबन ...

A man from Sangli who came for tourism in Ganapatipule died | गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील एकाचा मृत्यू 

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील एकाचा मृत्यू 

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सचिन बबन कापसे (३८, रा. जत, सांगली) असे त्याचे नाव आहे.

याबाबत माहिती देणारे हे आपल्या कुटुंबासह खासगी गाडीवर सचिन कापसे याला चालक म्हणून घेऊन गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमाराला तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करून सर्व जण गाडीजवळ येत असताना चालक सचिन कापसे चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने मालगुंड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले हाेते.

त्यानंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मध्यरात्री २:२५ वाजता त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A man from Sangli who came for tourism in Ganapatipule died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.