Ratnagiri: कशेडी बोगद्याच्या नवीन मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:40 IST2025-06-17T18:38:52+5:302025-06-17T18:40:03+5:30

खेड : गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जोड रस्त्यावर बोगद्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर ...

A landslide occurred on the connecting road of the Kashedi tunnel on the Mumbai Goa highway | Ratnagiri: कशेडी बोगद्याच्या नवीन मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने अडथळा

Ratnagiri: कशेडी बोगद्याच्या नवीन मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने अडथळा

खेड : गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जोड रस्त्यावर बोगद्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रविवारी सायंकाळी दरड कोसळली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेतून सुरू करण्यात आली होती. या मार्गावरील तब्बल २ तास वाहतूक विस्कळीत झाली हाेती.

या घटनेनंतर सुमारे दीड तासानंतर ठेकेदार कंपनीकडून दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस हवालदार शंकर कुंभार यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, कशेडी बोगद्याच्या जोड रस्त्यावर वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन संबंधित खाते आणि ठेकेदार कंपनी यांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रात्री अपरात्री कशेडी बोगद्याच्या दोन्ही बाजूने टीम सज्ज ठेवणे गरजेचे आहे.

Web Title: A landslide occurred on the connecting road of the Kashedi tunnel on the Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.