शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

दापोलीत लिफ्टच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:27 IST

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्टसाठीच्या टाकीत बुडून पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ...

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्टसाठीच्या टाकीत बुडून पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. समीर श्रीकांत चव्हाण असे त्याचे नाव आहे. आपल्यासारख्याच लहानग्या भावासोबत खेळता खेळता समीर या टाकीत पडला आणि जगण्याचा आनंद घेण्याआधीच त्याची प्रवासयात्रा संपली.ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत. या प्रकाराची पूर्ण चौकशी व्हावी आणि दोषी लोकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.श्रीकांत काशीनाथ चव्हाण (रा. मंद्रूप सेवालालनगर, सरकारी दवाखान्याजवळ, तालुका जिल्हा सोलापूर) आपल्या दोन मुलांना घेऊन बुधवारी संध्याकाळी सोलापूर येथून निघाले. गुरुवारी सकाळी आठ वाजता ते दापोलीमध्ये पोहोचले. बारा वाजता अन्नदानात जेवणासाठी ते उपजिल्हा रुग्णालयासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बसले. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले तेथे खेळत होती.उपजिल्हा रुग्णालयासाठी नवी इमारत बांधली जात आहे. त्यातील लिफ्टच्या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठले आहे. दोन्ही भाऊ खेळता खेळता पाच वर्षांच्या समीरचा तोल गेला आणि तो टाकीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जिवाचा बळी गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, सुहानी खानविलकर, तसेच शिंदेसेनेचे शहराध्यक्ष पप्पू रेळेकर व उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

कारवाई न झाल्यास आंदाेलनया घटनेची नोंद करण्याचे काम पोलिस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर आंदाेलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.