रत्नागिरीतील नामांकित क्रिकेटपटूचा खेळताना मृत्यू; चक्कर येऊन पडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:49 IST2026-02-07T14:47:13+5:302026-02-07T14:49:29+5:30
मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या एका उत्तम क्रीडापटूचा मैदानातच कोसळल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

रत्नागिरीतील नामांकित क्रिकेटपटूचा खेळताना मृत्यू; चक्कर येऊन पडला अन्...
Ratnagiri Cricketer Death : क्रिकेट खेळताना चक्कर येऊन मैदानात काेसळलेल्या रत्नागिरीतील एका खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी चिंचखरी येथे घडली. प्रवीण बबन पवार (४०) असे त्यांचे नाव आहे.
प्रवीण पवार हे उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात हाेते. चिंचखरी येथे क्रिकेट खेळण्यासाठी ते गेले होते. एका सामन्यादरम्यान नाॅनस्ट्राइककडे येत असताना त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर काेसळले. त्यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
जवळच्यांना धक्का
त्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी येथील पत्रकारिता क्षेत्रातही पत्रकार म्हणून काम पाहिले होते. सध्या ते कसोप येथे राहत होते. रत्नागिरी शहरात त्यांचे स्पोर्टस दुकान आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख हाेती.