तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल, तरुणाच्या बहिणीची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:10 IST2022-10-29T13:09:59+5:302022-10-29T13:10:27+5:30
रत्नागिरी : तरुणीला भेटायला गेलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीतील साईभूमीनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ...

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल, तरुणाच्या बहिणीची पोलिसात तक्रार
रत्नागिरी : तरुणीला भेटायला गेलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीतील साईभूमीनगर येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली होती. साहिल विनायक मोरे (२४, रा. जाकिमिऱ्या, अलावा, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरुन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी साहिलची बहीण ऋतिका विनायक मोरे (२८, रा. जाकिमिऱ्या अलावा, रत्नागिरी) हिने बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. साहिल हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रत्नागिरीतील साईभूमी येथे तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. प्रेयसीची मैत्रीणही तिथे होती. दरम्यान, साहिल तरुणीला लग्नाबाबत वारंवार विचारणा करत होता. परंतु, ती त्याला वारंवार नकारच देत होती.
आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने साहिलने त्याठिकाणी सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली, असे त्याच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. आपल्या भावाला आत्महत्या करण्यास तरुणीनेच प्रवृत्त केल्याचे साहिलची बहीण ऋतिका हिने म्हटले आहे. साहिलच्या बहिणीने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून, त्यानुसार पोलिसांनी साहिलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.