शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

परिचितांकडूनच झाले ९१ टक्के अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:07 IST

CrimeNews Ratnagiri- कोरोनामुळे गतवर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी या कालावधीत महिलांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला असून २०१९ च्या तुलतेन २०२० मधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटले आहे. अत्याचाराचे प्रमाण कमी झाले असले तरी झालेल्या प्रकारांमधील ९१ घटना या त्या पीडितेच्या परिचितांकडूनच झाल्या आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात अत्याचारांमध्ये थोडी घट महिलांना काही अंशी दिलासा

तन्मय दातेरत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी या कालावधीत महिलांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला असून २०१९ च्या तुलतेन २०२० मधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटले आहे. अत्याचाराचे प्रमाण कमी झाले असले तरी झालेल्या प्रकारांमधील ९१ घटना या त्या पीडितेच्या परिचितांकडूनच झाल्या आहेत.महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार हे त्यांच्या आसपासच्या, ओळखीच्या लोकांकडूनच केले जात असल्याचा गंभीर प्रकार गेल्या काही वर्षात पुढे आला आहे. परिचय असल्याचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यातही कमी नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे कमी नाहीत. गेल्या काही वर्षात वाढ झालेली दिसून येते. सन २०१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अत्याचाराचे ४८ गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल झाले. त्यात ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील ५७ जण पीडित महिलेचे परिचित होते.

याचवर्षी विनयभंगाचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये १२६ जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. यातील १२५ संशयित हे पीडितांच्या परिचयाचे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सन २०१९ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक केल्याचे १८ गुन्हे दाखल झाले आहेत, तर हुंडाबळीचा १ गुन्हा खेड पोलीस स्थानकात दाखल आहे.सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि अवघे जग कोरोनाचा चक्रात अडकून गेले. माणसे आपापल्या घरात बंद झाली. यामुळे महिलांवरील अत्याचार पूर्णपणे कमी होतील ही अपेक्षा जरी फोल ठरली असली तरीही मात्र त्यात घट झालेली दिसून येते. गतवर्षी महिला अत्याचाराचे जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये ३८ गुन्हे दाखल होऊन यामध्ये ४८ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ४८ पैकी महिलांवर अत्याचार केल्याचा संशय असलेले ४४ जण परिचित आहेत.महिलांनी भयमुक्त वातावरणात राहण्यासाठी विविध संकल्पनारत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचा सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाने अनेक पावले उचली असून महिलांनी भयमुक्त वातावरणात रहावे यासाठी विविध संकल्पना जिल्ह्यात आम्ही राबवत असल्याची माहिती जिल्हा पोलीस डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी ह्यलोकमतह्णला दिली. ज्या महिलांना मदतीची आवश्यकता आहे त्यांनी १०९१ या क्रमांकावर न घाबरता संपर्क करावा असे आवाहनही डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी