शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

५१ शिक्षकांच्या पदावनतीचे आदेश

By admin | Updated: March 26, 2015 00:02 IST

शिक्षण समितीत ठराव : ४७ पदवीधर शिक्षक, तीन केंद्रप्रमुख, एक विस्तार अधिकारी

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाची बोगस पदवी धारण केलेल्या ४७ पदवीधर शिक्षक, तीन केंद्रप्रमुख आणि एक विस्तार अधिकारी यांना पदावनती देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.
शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत अलाहाबाद विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या ५३ पदवीधर शिक्षकांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर या सभेत जोरदार चर्चा झाली. या चर्चेमध्ये सभापतींसह सदस्यांनी बोगस पदवीधरांना पदावनती देण्याचा ठामपणे निर्णय घेऊन तसा ठरावही मंजूर केला. शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन न मागविता थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या पदावनतीचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण या ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. या तिन्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांचा चार्ज काढून घेण्यात यावा. त्यांच्याऐवजी अन्य विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज द्यावा, असा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
इयत्ता आठवी, शून्य शिक्षकी शाळा आणि तक्रारी असलेल्या शाळांवर कामगिरी शिक्षक काढावेत आणि इतर शाळांमध्ये कामगिरीवर असलेल्या शिक्षकांना त्यांच्या शाळेवर पाठविण्यात यावे, असा महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. (शहर वार्ताहर)

लोकमतचा दणका
अलाहाबाद विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या पदवीधरांबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आणि केवळ ‘लोकमत’नेच त्याचा पाठपुरावा केला. या वृत्ताची दखल शिक्षण समितीच्या मागील सभेत घेऊन बोगस पदवीधर शिक्षकांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती प्रकरणाचीही चौकशी
राजापूर तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना व्हरांड्यामध्ये जमिनीवर बसावे लागले होते. त्यामुळे पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या हलगर्जीपणाबद्दल सभेत जोरदार चर्चा होऊन चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती घोसाळकर यांनी दिले.

अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधारकांना जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या निर्णयाने झटका
तीन प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा
चार्ज काढणार
राजापूर तालुक्यातील
शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची चौकशी होणार
इतर शिक्षकांची कामगिरी
रद्द करणार