शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकाच दिवशी झाले २७ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या, विशेषतः कोरोनाचे हाॅटस्पॉट होऊ लागलेल्या मुंबईतून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात ...

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या, विशेषतः कोरोनाचे हाॅटस्पॉट होऊ लागलेल्या मुंबईतून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविला आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल २७ हजार ३१२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यातील १५२ सरकारी केंद्रे आणि ८ खासगी केंद्रांवर लस देण्यात आली. यापैकी पहिला डोस १९,८५९ आणि ७,४५३ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

जिल्ह्यात सुमारे ११ ते १२ लाख १८ वर्षांवरील आहेत. सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा अपुरा पडू लागल्याने जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत केवळ ३५ ते ४० टक्के इतकेच लसीकरण झाले हाेते. मात्र, ऑगस्ट महिन्यात विशेषतः उत्तरार्धात जिल्ह्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले आहेत.

कोराेनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लसचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास दररोज २५ हजार डोसचे वितरण करण्याची तयारी ठेवली होती.

त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने पहिला डोस आणि दुसरा डाेस राहिलेल्यांची प्रतीक्षा हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे.

गेल्या आठ महिन्यात बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) जिल्ह्यातील १५२ सरकारी आणि ८ खासगी अशा एकूण १६० केंद्रांवर तब्बल २७ हजार ३१२ इतके डोस देण्यात आले. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी नियोजन केले असून, त्यांच्या यंत्रणेच्या साहाय्याने आता लसीकरणाला वेग आला आहे. आतापर्यंत ८ लाख २१ हजार डोस देण्यात आले आहेत. यापैकी पहिला डोस ५ लाख ७५ हजार तर २ लाख ४६ हजार ४३२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

.....

जिल्ह्याला आता मुबलक प्रमाणात लस मिळत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने प्रत्येक दिवसाला अधिकाधिक लस देण्याचे नियोजन केले आहे.

डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी

......

आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी

वयोगट पहिला डोस (टक्के) दुसरा डोस (टक्के)

१८ ते ४४ ३३.६४ ६.६७

४५ ते ६० ५६.७१ २८.८२

६० वरील ६१.७७ ३४.९०

१८ वरील ४९.८२ २१.६०