फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वे प्रशासनाची कारवाई

By शोभना कांबळे | Published: December 19, 2023 06:22 PM2023-12-19T18:22:57+5:302023-12-19T18:23:55+5:30

कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे

2 crores fine from passengers traveling without tickets, action taken by Konkan Railway Administration | फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वे प्रशासनाची कारवाई

फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वे प्रशासनाची कारवाई

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रूपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढही ही मोहीम सुरूच रहाणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक वेळा गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रूपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात राबविलेल्या विशेष मोहीमेत कोकण रेल्वे प्रशासनाने  विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कारवाई करून २ कोटी ०५ लाख ५२ हजार ४४६ रूपयांचा दंड वसूल केला आहे.

कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरूच रहाणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: 2 crores fine from passengers traveling without tickets, action taken by Konkan Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.