रत्नागिरीकरांना दिलासा, तूर्तास पाणी कपात नाही

By मेहरून नाकाडे | Published: April 16, 2024 01:58 PM2024-04-16T13:58:53+5:302024-04-16T13:59:42+5:30

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, ...

1.176 million cubic meters of water storage in Sheel dam which supplies water to Ratnagiri city | रत्नागिरीकरांना दिलासा, तूर्तास पाणी कपात नाही

रत्नागिरीकरांना दिलासा, तूर्तास पाणी कपात नाही

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, असा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एक दिवस पाण्याचे संकट तूर्तास तरी निवारले आहे.

रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या आहेत. त्यांना दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी तीन महिने आधीपासून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करून शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दर सोमवारी व गुरुवारी पाणी कपात केली जात आहे. 

गतवर्षी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे दि. १५ एप्रिल (२०२३) पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. एकीकडे कडक उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. असे असले तरी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे उपलब्ध पाणीसाठा दि.१५ जून पर्यत पुरेल असा दावा रत्नागिरी नगर परिषदेने केला आहे. त्यामुळे एक दिवसा आड पाणी कपातीचे संकट लांबले आहे.

Web Title: 1.176 million cubic meters of water storage in Sheel dam which supplies water to Ratnagiri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.