शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला..."; असदुद्दीन ओवेसींचे अमरावतीत नवनीत राणांना प्रत्यूत्तर
2
मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा
3
शरद पवार यावेळी खासदार बनू शकणार नाहीत? ओवेसी यांनी राज्यसभेचे गणित सांगितले; भविष्यातील राजकारणाचे दिले संकेत
4
नेहरुंनीही नेपाळच्या राजाला काठमांडूतून उचललेले?; व्हेनेझुएलाच्या निमित्ताने त्या ऐतिहासिक घटनेची चर्चा...
5
नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून
6
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली? झाल्या चर्चा; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
7
"अभिषेक असता तर भाजपची हिम्मत झाली नसती"; दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, "तेजस्वीसोबत भांडण नाही"
8
भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट?  नेटकरी झालेत अवाक् 
9
तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
10
पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
11
इराणमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, सर्वोच्च नेते खोमेनी रशियाला पळून जाण्याचा तयारीत
12
"जय दुधाणे आणि हेमलतासारखी अटक विजय मल्याला कधी होणार?", मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: १२ राशींपैकी बाप्पाची कृपा कोणावर? कोणाला फायदा? कोणाला तोटा?
14
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
15
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
16
परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक
17
सुरक्षित गुंतवणुकीचा 'सुपर' पर्याय! पोस्टाच्या NSC मध्ये २.५० लाखांवर मिळवा १.१६ लाखांचे फिक्स व्याज
18
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
19
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
20
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत 100 फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 13:34 IST

100 फूट उंच उभारण्यात आलेला ध्वज हा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे उद्गार पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काढले आहेत.

रत्नागिरी - रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फूट उंच उभारण्यात आलेला ध्वज हा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे उद्गार पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काढले आहेत. या ध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री वायकर म्हणाले की, गेली पाच वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना या जिल्ह्यातील नागरिकांनी व आपल्या सहकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. अनेक विविध प्रसंगामध्ये या जिल्ह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले. निर्सगाचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा विकास सदैव होत राहील, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा ध्वज उभारण्याच्या कामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच डी. के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी यांनी हा ध्वज उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. 

विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तटरक्षक दलाचे दांडेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सुखटणकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

20730 फूट आकाराचा हा ध्वज एनसीसी कॅडेटनी आणून पालकमंत्री वायकर व उपस्थित मान्यवरांकडे सुपुर्द केला. यानंतर हा ध्वज ध्वजस्तंभावर चढविण्यात आला आहे. यावेळी डी. के. फाऊंडेशनचे डॉ. बक्षी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी, ठेकेदार युवराज बोंद्रे, गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी झांजपथक व लेझीम नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, तटरक्षक दल, पोलीस दल, एनसीसीचे विद्यार्थी आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndiaभारतRavindra Vaikarरवींद्र वायकर