शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नाणीज येथे ट्रक-कार अपघातात १ ठार, ५ जखमी; लग्नासाठी जाताना घडली दुर्घटना

By अरुण आडिवरेकर | Published: December 02, 2022 6:46 PM

कारची समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकला जोराची धडक

रत्नागिरी : लग्नासाठी जाणाऱ्या कारची समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली असून, ५ जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर नाणीज जवळील इरमलवाडी येथे आज, शुक्रवारी  दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय-७०, रा. वाडावेसवरांड, फनसवणे (भंडारवाडी)) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर हरिश्चंद्र वारंग (वय-६५), हर्षदा हरिश्चंद्र वारंग (६०), विक्रांत हरिश्चंद्र वारंग (३०), सुनील पेडणेकर (५५), सुषमा सुनील पेडणेकर (५०, सर्व रा. खारघर, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील (३८, रा. उंब्रज ता. इंडी, जि. विजापूर) हा जयगडहून ट्रक (एमएच ०९, सीए ३१२४) घेऊन सोलापूरला निघाला होता. दरम्यान, नाणीज येथील इरमलवाडी वाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०१, डीपी २६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली आहे. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी चाललेले होते.या अपघाताची माहिती नाणीज येथे समजताच तरुणांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. याच वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय दाखल केले. अधिक तपास पाली पोलिस स्थानकाचे हवालदार मोहन कांबळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू