आठवड्याचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 11:38 IST2019-11-03T11:37:30+5:302019-11-03T11:38:21+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2019
मेष
आठवड्याची सुरवात व्यावसायिक आघाडीवर मोठ्या उलाढालीने होईल. ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी राग नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आणखी वाचा
वृषभ
व्यापारी किंवा व्यावसायिक वर्ग नवीन प्रकल्पाचा प्रारंभ किंवा नियोजन करू शकतील. नोकरी - व्यवसायात वरिष्ठ किंवा ग्राहक ह्यांच्या कडून कामाची फलश्रुती म्हणून शाबासकी मिळू शकेल. आणखी वाचा
मिथुन
आठवड्याच्या सुरवातीस नोकरीत वरिष्ठांची वागणूक नकारात्मक असल्याने सावध राहावे लागेल. मात्र, आपली बुद्धिमत्ता व सर्जनात्मकता ह्यांची उत्तम साथ आपणास मिळेल. आणखी वाचा
कर्क
आपल्या मनात विविध विचारांच्या लाटा उसळतील. आठवड्याचा पूर्वार्ध प्रेमालापासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या मध्यास आपले मन काहीसे व्याकुळ होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. आणखी वाचा
सिंह
ह्या आठवड्यात मित्रांशी स्पर्धा करण्याच्या नादात अतिरिक्त खर्च होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक आघाडीवर नियोजित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या सुरवातीस संबंधांवर आपण अधिक लक्ष द्याल. प्रेम संबंधात भेटीगाठीसाठी तसेच मागणी घालण्यास हा आठवडा अनुकूल आहे. आणखी वाचा
तूळ
आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबास आपले प्राधान्य राहील. कुटुंबियांच्या सौख्यासाठी आपण घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. आणखी वाचा
वृश्चिक
वैवाहिक जोडीदार व संतती कडून लाभदायी बातमी मिळेल. मित्रांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. व्यावसायिक आघाडीवर प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा
धनु
ह्या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. थोड्या विश्रांतीची आपणास गरज आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराची साथ आपणास नवीन शक्ती व प्रेरणा देईल. आणखी वाचा
मकर
आठवड्याच्या सुरवातीस आपल्यात उत्साह असल्याने आपण अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल, व ती पूर्ण झाल्याने नव्या कामाची अपेक्षा बाळगू शकाल. आणखी वाचा
कुंभ
आपल्या मनाच्या चंचलतेमुळे व बेचैनीमुळे कामात आपले मन लागणार नाही व त्यामुळेच ह्या आठवड्यात आपणास सावध राहावे लागेल. आणखी वाचा
मीन
मनोरंजन किंवा कामा निमित्त लहानसा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. आणखी वाचा