आठवड्याचे राशीभविष्य - 30 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 10:32 IST2018-12-30T10:30:49+5:302018-12-30T10:32:12+5:30
कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

आठवड्याचे राशीभविष्य - 30 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019
मेष
आठवड्याच्या सुरुवातीस आपणास मानसिक त्रास जाणवेल. आपणास आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यस्थळी कामाचा भार वाढल्याने तेथील वातावरण अशांत राहील. मागील अनेक दिवसांपासून कौटुंबिक वातावरण अशांतच असल्याचे दिसत आहे... आणखी वाचा
वृषभ
आठवड्याची सुरुवात लाभदायी राहील. प्राप्तीत नफा व गुंतवणुकीत लाभ होईल. रोगमुक्ती होईल. शत्रूंवर विजय प्राप्त करू शकाल व स्पर्धेत सुद्धा विजयी व्हाल. शुभ कार्यांसाठी खर्च होतील. उत्तम कौटुंबिक सुख प्राप्त होईल... आणखी वाचा
मिथुन
संपूर्ण महिना आपल्यासाठी सामान्यच राहणार आहे. विद्यार्थीवर्गास थोडा दिलासा मिळू शकेल. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. नोकरी - व्यवसायात यश पदरी पडेल. आपल्या सहकाऱ्यांचे संपूर्ण सहकार्य लाभू शकेल... आणखी वाचा
कर्क
आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र खर्च करताना योग्य विचार करावा, अन्यथा आर्थिक त्रास जाणवेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. माता - पित्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल... आणखी वाचा
सिंह
आठवडा आपण हौसमौज करण्यात व आनंद प्रमोद करण्यात घालवाल. जुने मित्र, नातेवाईक व हितचिंतक यांची भेट घडेल. कुटुंबियांसह प्रवासास किंवा रमणीय स्थळी फिरावयास जाण्याचे आयोजन करू शकाल. तसेच त्यांना आपला भरपूर वेळ देऊ शकाल... आणखी वाचा
कन्या
आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपली हौस पूर्ण करण्यासाठी काही खर्च करण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. पूर्वार्धात आपण आपले प्रेम सुद्धा व्यक्त करू शकाल... आणखी वाचा
तूळ
३० डिसेंबर पासून सुरु होत असलेला हा आठवडा आपल्या राशीपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे मान - सन्मान होऊन नवीन काहीतरी करण्याची इच्छा होईल. या आठवड्यात आर्थिक फायदा होईल. लहान भावंडे व शेजाऱ्यांमुळे काही फायदा होईल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवड्याचे सुरुवातीचे दिवस लाभदायी आहे. अनावश्यक खर्चावर आळा घालावा. कौटुंबिक कलह होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या चित्तावरील ग्लानी दूर होऊन प्रसन्नतेचा अनुभव घ्याल... आणखी वाचा
धनु
आठवडा आपल्यासाठी अनेक चढ - उतारांचा असल्याने मिश्रफलदायी ठरेल. आरोग्याच्या बाबतीत मध्यम आहे. सर्दी, ताप, वायरल इन्फेकशन इत्यादींचा त्रास संभवतो. गुढघेदुखीचा त्रास संभवतो. या आठवड्यात प्रणयी जीवनात सुद्धा चढ - उतार येतील... आणखी वाचा
मकर
आठवडा आपल्यासाठी प्रगतीकारक आहे. शारीरिक, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्ट्या दिवस अनुकूल आहेत. कारकिर्दी व व्यवसायासाठी आठवडा उत्तम आहे. नोकरीतील असंतोष दूर होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कुंभ
आठवड्याची सुरुवात काहीशी मानसिक चिंतेने होईल. प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. परंतु आठवडा जसा पुढे सरकेल तशी त्यात सुधारणा होऊ लागेल. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन उत्तम धनप्राप्ती होईल... आणखी वाचा
मीन
३० डिसेंबरपासून सुरू होत असलेला हा आठवडा आपल्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणेल. नव्या वर्षाच्या सुरवाती पासून आपणास आपल्या रागास नियंत्रित ठेवावे लागेल, अन्यथा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर व कुटुंबात कटुता निर्माण करण्यात होईल... आणखी वाचा