weekly horoscope 19 january To 25 january 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 19 जानेवारी ते 25 जानेवारी 2020

आठवड्याचे राशीभविष्य - 19 जानेवारी ते 25 जानेवारी 2020

मेष

 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आपण प्रियव्यक्तीशी जवळीक साधू शकाल. आपल्यात विचारांची देवाण - घेवाण होईल. आपण दोघेही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. मात्र, पहिल्या दिवसाच्या दुपार पासूनचे दोन दिवस आपणास काळजी घ्यावी लागेल. दरम्यान आपणास बेचैनी जाणवेल, त्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. अशा परिस्थितीत आपण काही नवीन विचार किंवा नवीन कशाची सुरवात करण्या ऐवजी आत्मपरीक्षण करून आपल्या निर्णयाचा व कामगिरीचा आढावा घेतल्यास ते जास्त हितावह ठरेल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्यात आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र उत्तरार्धात अचानकपणे खर्चात वाढ झाल्याने बँकेतील गंगाजळीत वाढ होणार नाही. गुंतवणूक करताना दीर्घकालीन आयोजन केल्यास फायदा होईल. ग्रहांची स्थिती बघता असे दिसते कि नवीन कामाची सुरवात सध्या लांबणीवर टाकणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी आठवड्याच्या सुरवातीस चांगली राहिली तरी काही कामात विलंब झाल्याने उत्तरार्धात आपल्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कार्यालयात अधिकारी वर्गाशी व घरात कुटुंबियांशी तसेच विरोधकांशी वादात न पडता कामावर अधिक लक्ष द्यावे... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्याच्या सुरवातीस आपणास संततीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. शेअर्स, सट्टा सदृश्य प्रवृत्तीची आठवड्याच्या प्रथम दिवशी खूपच आवड निर्माण होईल, परंतु त्यात डोळेझाक धाडस करणे टाळावे. घरात सुख - शांती नांदल्याने मन प्रसन्न राहील. आनंददायी घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. कार्यस्थळी, व्यापारात किंवा नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. व्यापारात प्रगती व वृद्धीसाठी कुबेराच्या पूजेने लाभ होईल. नवीन कामाची सुरवात करताना सावध राहावे व आवश्यकता भासल्यास इतरांचा सल्ला घ्यावा... आणखी वाचा

कर्क

आठवड्यात कुटुंबियांशी किंवा प्रियव्यक्तीशी मतभेद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. आपल्या मधुर वाणीने आपण लोकांना प्रभावित करू शकाल परंतु वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्ती ह्यांच्याशी असलेल्या संबंधात अहंकार आडवा येऊ शकतो. प्रवासाची किंवा सहलीची शक्यता आहे. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश प्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. सहकारात आपल्या बरोबर असलेली व्यक्ती आपणास अधिक उत्तम प्रकारे मदत करू शकेल. कोणत्याही दस्तावेजावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे नीट वाचन करावे... आणखी वाचा

सिंह​​​​​​​

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आपले मन व्याकुळ राहिल्याने कामात एकाग्रता होऊ शकणार नाही. संबंधात सुद्धा गोडी वाटणार नाही. पहिल्या दिवशी महत्वाचे निर्णय घेणे टाळावे. त्या नंतरचे दिवस कुटुंबियांना दिलेली वचने व आश्वासने पूर्ण करण्यास अनुकूल असल्याचे दिसत आहे. आपण जर वचनबद्धतेस गंभीरपणे न घेता फक्त हौसमौज करण्याची उत्कट इच्छा दर्शविलीत तर संबंधात शंका व गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसून येईल... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. एखादी तीर्थयात्रा संभवते. परदेश गमनाची संधी मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. आर्थिक लाभ जसा होईल तसे आपण धार्मिक कार्यासाठी खर्च करण्यास सुद्धा प्रेरित व्हाल. सध्याच्या परिस्थितीत हितशत्रू संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, म्हणून व्यावसायिक आघाडीवर सावध राहावे. कार्यालयात वरिष्ठांशी संबंध टिकवून ठेवल्यास त्रास होणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात नवीन कार्याचा आरंभ करण्याचा किंवा नवीन आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होईल... आणखी वाचा

तूळ

आठवड्याची सुरवात आपण सकारात्मकतेने कराल व आपल्यावर कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद राहतील. तसेच व्यावसायिक आघाडीवर वरिष्ठांच्या सहकार्याने वाटचाल कराल. आत्मविश्वास उत्तम राहिल्याने काळजीचे कारण उरणार नाही. सध्या मात्र वाणी संयमित ठेवावी लागेल. आपण काही व्यावहारिक खर्च करण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापार - व्यवसाय व नोकरीत सहकाऱ्यांशी आपले संबंध सौहार्दाचे राहतील... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपार पर्यंत आपणास थोडी बेचैनी जाणवेल किंवा एखाद्या व्यक्तीशी असलेल्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या नंतर मात्र सर्व काही सुरळीत होईल. आठवड्याच्या पूर्वार्धात परदेशातून काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. आपण स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. स्वतःसाठी सढळ हस्ते खर्च कराल, ज्यामुळे आभूषणे, वस्त्र इत्यादींची खरेदी होऊ शकेल. आपले संबंध सध्या कामी येतील. आपण कुटुंबियांच्या सहवासात उत्तम प्रकारे वेळ घालवू शकाल. प्रवासाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही... आणखी वाचा

धनु

आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपार पर्यंत आपण आनंदात व उत्साहात वेळ घालवू शकाल. कामात एकाग्रचित्त होऊन लाभ होण्याची अपेक्षा सुद्धा बाळगू शकता. मात्र, त्या नंतरच्या दिवसात आपले मन हळू हळू व्याकुळ होत जाईल. अशा स्थितीत सरकार विरोधी प्रवृतींचा त्रास होईल. प्राप्तीच्या मानाने खर्चाचे प्रमाण वाढीव राहील. सुरवातीस प्रतिस्पर्धी आपल्यावर मात करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा सावध राहावे. उत्तरार्धात धनप्राप्तीसाठी अनुकूलता लाभेल. व्यापारातील वसुली व प्रवास होतील... आणखी वाचा

मकर 

आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक आघाडीवर आपली सक्रियता वाढेल. आपली बहुतांश कार्ये हि प्राप्तीत वाढ करण्याच्या दृष्टीने केलेली असतील. सध्या पिता, वडीलधारी, वरिष्ठ किंवा सरकार कडून फायदा होऊ शकेल. पैतृक संपत्तीतून प्राप्तीत वाढ किंवा आर्थिक लाभ होऊ शकेल. सत्तेसाठी झटणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपणास एखादे स्वप्न पडत असल्याचे वाटून हे स्वप्न साकार होण्यासाठी संधी मिळत असल्याचे जाणवेल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याच्या सुरवातीपासूनच आपण कामाकडे जास्त लक्ष द्याल. विस्तार व नवीन सुरवात करण्याची योजना मनात आकार घेऊ लागेल. वारसा, संयुक्त साहस, विमा, गुंतवणूक ह्या सर्वांची आपणास आठवण होत राहील. अनेक दिवसांपासून आपण जे प्रकल्प स्थगित ठेवले होते ते आता पूर्ण होताना दिसतील. साहसिक कार्य करण्यास आपण प्रेरित व्हाल. मात्र, नोकरी करणाऱ्याना सध्या वरिष्ठांपासून जपून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्यावसायिकांना सुद्धा कायदेशीर व सरकारी तरतुदीमुळे काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मीन 

आठवड्याची सुरवात आपण आत्मसंयमाने करावयाची आहे. त्यागाची क्षमता व इतरांचा विचार करण्याची भावना बाळगावी लागेल. चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी धावपळ करण्यास सज्ज राहावे लागेल. व्यावसायिक आघाडीवर पहिल्या दिवशी दुपार पर्यंत शक्यतो कोणताही निर्णय घेणे टाळावे. त्या नंतरच्या काळात नवीन सौदे, आर्थिक व्यवहार, बैठका, प्रवासी संस्थेतील भागीदारी अधिक वेग धरेल. अतिरेक करणे टाळा. कोणत्याही प्रकारचा अतिरेक जोखीमकारक ठरू शकतो... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscope 19 january To 25 january 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.