weekly horoscope 17 november To 23 november 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019

मेष

 

आठवड्याच्या प्रथम दिवशी दुपार पर्यंत आपणास उत्साहासह थोडा आळस सुद्धा जाणवेल. त्यामुळेच आठवड्याची सुरवात मिश्र फलाने होईल. मात्र, दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. विशेषतः सुरवातीस कुटुंबाशी संबंधित गोष्टींकडे आपले अधिक लक्ष केंद्रित होईल. ह्या व्यतिरिक्त एखाद्या कौटुंबिक सोहळ्यास उपस्थित राहावे लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील महिला वर्गाकडे आपणास अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या मध्यास आपल्या प्रिय व्यक्तीशी आपली जवळीक वाढेल. प्रेम प्रकरणास नव्याने सुरवात होऊ शकेल... आणखी वाचा

वृषभ 

व्यावसायिक आघाडीवर सध्या आपण उत्साहात पुढील मार्गक्रमण कराल. नवीन सुरवात करण्यात किंवा धाडस करण्यात आपण मागे राहणार नाहीत. नोकरीत बढती किंवा अन्य प्रकारचे लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्याच्या मध्यास कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. अविवाहित व्यक्ती विवाहाचा गंभीरपणे विचार करतील. उत्तरार्धात भिन्नलिंगी व्यक्तींच्या संपर्कात वाढ होईल. सध्या आपले संबंध चांगले असले तरी आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसात वैवाहिक जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी संबंधित एखाद्या समस्येचा आपणास त्रास होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंत थोडा त्रास जाणवेल व कशातही आपले मन रमणार नाही. ह्या व्यतिरिक्त ह्या दरम्यान खर्चाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. दुपार नंतर परिस्थितीत खूप सुधारणा होईल. हा आठवडा प्रेमालापासाठी उत्तम आहे. मात्र, राग व वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा कटू प्रसंग उदभवण्याची शक्यता आहे. नोकरीत आपल्या मर्यादा स्पष्ट होतील. कामात यशप्राप्ती होईल. घरातील वातावरण शांत व आनंदमय राहिल्याने आपल्या मनास प्रसन्नता लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कौटुंबिक, मित्र मंडळ व व्यावसायिक आघाडीवर वेळ चांगला गेल्याने आपले कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील... आणखी वाचा 

कर्क

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण जर नकारात्मक विचारांपासून दूर राहिलात तर मानसिक स्थैर्य टिकून राहील. आपणास कार्यात यशप्राप्ती होण्यात विलंब झाला तरी धीर न सोडता प्रयत्न चालूच ठेवावेत. पहिल्या दिवशी संध्याकाळी आर्थिक नियोजनाचा मार्ग मोकळा असल्याचे जाणवेल. दुसऱ्या दिवसापासून आपल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. नोकरी - व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंदी राहील. नोकरी - व्यवसायासाठी हा आठवडा लाभदायी आहे...  आणखी वाचा

सिंह

आठवड्यात नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता दिसत आहे. उत्तरार्धात सर्जनात्मक विचार व कामातील नाविन्यामुळे आपल्या प्रगतीची शक्यता प्रबळ होऊ शकेल. गृहजीवनात गोडवा व्यापून राहील. मात्र, सुरवातीस आपणास सावध राहावे लागेल. विशेषतः दि. १७ च्या दुपार नंतर ते दि. १९ च्या संध्याकाळ दरम्यान आपले मन अधिक व्याकुळ होण्याची शक्यता आहे. व्यतिरिक्तच्या दिवसात आपणास विशेष लाभ प्राप्ती होईल. व्यापारी वर्गास प्राप्तीत वाढ होईल. विवाहेच्छुकांनी थोडी तडजोड केल्यास त्यांना योग्य जोडीदार मिळू शकेल... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात व्यावसायिक आघाडीवर नोकरी करणाऱ्या व्यक्ती बोनस, पगारवाढ, बढती किंवा उच्च पदासह बढतीची अपेक्षा बाळगू शकतात. व्यावसायिकांच्या कामात वाढ होऊन गिऱ्हाईक वाढण्याची शक्यता आहे. सध्या आपला व्यापारी दृष्टिकोन व व्यूह कामात वाढ करण्यात मदतरूप ठरेल. आपले शेजारी, भावंडे किंवा मित्रमंडळासह आनंदात वेळ घालवू शकाल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. प्रकृती उत्तम राहिली तरी दि. २० व २१ दरम्यान आरोग्य विषयक काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ 

व्यापारी वर्गाच्या व्यापारात व प्राप्तीत वाढ होईल. मित्रांपासून लाभ होतील व त्यांचा सहवास आनंददायी ठरेल. वैवाहिक जोडीदार व संततीकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या कृपेने आपणास लाभ होईल. परदेशाशी संबंधित कार्याचे निराकारण होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसत आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आपली वाणी व वर्तनामुळे आपण एखाद्या व्यक्तीस प्रभावित करू शकाल, मात्र आपल्या वाणीत अहं किंवा वर्चस्वाची भावना असता कामा नये... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्यात आपणास अनेक सामाजिक संमेलनात सहभागी व्हावे लागेल. ह्या व्यतिरिक्त व्यावसायिक आघाडीवर सुद्धा आपली व्यस्तता वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. शेअर्स बाजारातून फायदा होईल. आपणास सोने - चांदी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू इत्यादींची खरेदी करण्याची ईच्छा होईल. प्रवास संभवतात. दीर्घ काळापासून आजारी असणाऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. संतती प्राप्ती किंवा संततीच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. सध्या अनावश्यक घाई टाळावी, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

धनु

आठवड्याच्या पूर्वार्धात संबंधांत विशेष लक्ष न लागण्याची व कामाचा सुद्धा कंटाळा येऊन विश्रांती घेण्याची आपली ईच्छा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपले वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते. शक्य असल्यास शरीरात ऊर्जा व उत्साह टिकून राहावा ह्यासाठी कामा बरोबरच थोडे मनोरंजन व आध्यात्मिक साधना इत्यादी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात आपणास कामात मदत करण्यासाठी मित्रांचे हात पुढे येतील. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहील. मात्र, संबंधात पारदर्शकता ठेवून समोरच्यास पुरता वेळ देण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागेल... आणखी वाचा

मकर 

आठवड्यात आपण उत्तम सांसारिक सुख उपभोगू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. समाजात आपला मान, प्रतिष्ठा, धन, पत ह्यात वृद्धी होईल. सामाजिक कार्यातील आपली सक्रियता वाढेल. कदाचित आपण एखादी सामाजिक जवाबदारी घेण्याची किंवा समाजाचे ऋण चुकविण्यासाठी काही काम करण्याची शक्यता सुद्धा आहे. बहुतांशी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मात्र, दि. २० व २१ रोजी बेचैनी, अस्वस्थता व शारीरिक दुर्बलता जाणवण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऋतुजन्य विकार व पोटाचे विकार ह्यांचा त्रास होईल... आणखी वाचा

कुंभ 

प्रणयी जीवनातील व वैवाहिक जीवनातील सध्याचे दिवस असे आहेत कि ज्यात स्पष्टीकरणाने कोणतेही गैरसमज लवकरच दूर होऊ शकतील. व्यावसायिक आघाडीवर कार्यात यश प्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर सहजपणे मात करता येईल. घरातील वातावरण सुद्धा आनंदमय राहील. शारीरिक व मानसिक स्फूर्ती व तजेला असून सुद्धा कामाचा कंटाळा येईल. विशेषतः काही ऋतुजन्य विकार किंवा अनिद्रा, सुस्ती ह्यामुळे संपूर्णपणे उत्साहितपणा दिसणार नाही... आणखी वाचा

मीन 

नोकरी करणाऱ्यांच्या सिद्धींची कार्यालयात दखल घेतली जाईल. परंतु त्याचा ताबडतोब लाभ न मिळाल्यास काळजी करू नये. आपली दैनंदिन कामे संथ परंतु एकसारख्या गतीने प्रगती पथावर असतील. सध्या कामात बदल करण्याची त्वरित ईच्छा होईल परंतु त्या बाबतचा निर्णय घेताना आवश्यकता भासल्यास इतरांचा सल्ला घेण्यात मागे राहू नका. मशीनरी, तांत्रिक कामे, वाहन, कृषी इत्यादींशी संबंधित कामात सध्या मंदीचा सामना करावा लागेल. कुटुंबियांशी संबंधित कार्यात खर्च होईल, परंतु त्यात यशप्राप्तीची आशा बाळगू नये... आणखी वाचा

​​​​​​​

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: weekly horoscope 17 november To 23 november 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.