Today's horoscopes September 19, 2019 | आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2019
आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2019

मेष -  दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साही राहाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्रपरिवार आणि स्वकीय यांच्यासमवेत स्नेहसंमेलन, समारंभाला जाणे होईल. आणखी वाचा

वृषभ - क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. आणखी वाचा

मिथुन - कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने तब्बेतीची कुरकुर वाढेल. परंतु दुपारनंतर मात्र तब्बेतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. तब्बेत बिघडू शकते. संताप वाढेल. दुपारनंतर मात्र शारीरिक उत्साह आणि मानसिक खंबीरता यांमुळे आनंदी राहाल. आणखी वाचा

सिंह - आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात आनंदी वातावरण राहील. व्यापार- धंद्यात उच्च अधिकार्र्यांशी महत्त्वाची चर्चा होईल. आणखी वाचा

कन्या - आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत. तब्बेतीच्या कुरकुरीमुळे व्यग्र राहाल. आणखी वाचा

तूळ - आज दिवसाची सुरुवात आनंददायक असेल असे श्रीगणेश सांगतात. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. पण दुपारनंतर, सायंकाळी अनर्थ होऊ नये यासाठी वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा

वृश्चिक - बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. असे श्रीगणेश सांगतात. जवळचा प्रवास घडेल. धन विषयक आराखडा बनविण्यासाठी वेळ शुभ आहे. दुपारी वा सायंकाळ नंतर मित्र आणि संबंधितांसह प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

धनु -  शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. सहल प्रवास शक्यतो टाळा. दुपारनंतर अनुकूल वातावरण. शरीरात उत्साह संचारेल. आणखी वाचा

मकर -  आज आपण फारच संवेदनशील राहाल असे श्रीगणेश सांगतात. भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. आणखी वाचा

कुंभ - महत्त्वाच्या कामाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तऐवज करण्यास वेळ अनुकूल नाही. आणखी वाचा

मीन - स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयाचा विचार करण्याची सूचना गणेशजी देत आहेत. घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. जिभेवर संयम ठेवून आपण वादविवाद किंवा मनस्ताप टाळू शकाल. आणखी वाचा


Web Title: Today's horoscopes September 19, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.