Today's horoscope - July 14, 2020, success at work, benefits in the financial sector | आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२०, कामात यश, आर्थिक क्षेत्रात लाभ, पण काही जणांना वाणीवर ठेवावा लागेल ताबा

आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२०, कामात यश, आर्थिक क्षेत्रात लाभ, पण काही जणांना वाणीवर ठेवावा लागेल ताबा

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल.  आणखी वाचा 

वृषभ - आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो.  आणखी वाचा 

मिथुन -  आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायदयाच्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. आणखी वाचा 

कर्क - नोकरी व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते.  आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल.  आणखी वाचा 

कन्या - आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद संभवतात. आणखी वाचा 

तूळ - आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल. भिन्नलिंगी व्यक्तीचा आज तुमच्यावर प्रभाव राहील. आणखी वाचा 

वृश्चिक -  आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. आणखी वाचा

धनु -​​​​​​​  श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

मकर -  श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा 

कुंभ - आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल. त्यांच्या बरोबर आनंदात वेळ जाईल.  आणखी वाचा 

मीन - श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

English summary :
Today's horoscope - July 14, 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - July 14, 2020, success at work, benefits in the financial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.