राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत मिळेल आनंदवार्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 09:24 PM2020-09-29T21:24:32+5:302020-09-29T21:24:59+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस...

todays Horoscope 30th September 2020 | राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत मिळेल आनंदवार्ता

राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत मिळेल आनंदवार्ता

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल आणि त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा

वृषभ - नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्यजीवनात गोडी राहील. तब्बेत चांगली राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील. आणखी वाचा

मिथून - श्रीगणेश म्हणतात की आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. तब्बेत बिघडेल. त्यामुळे कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार आहे. नोकरी धंद्यात सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्ट्या निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीच्या तक्रारी राहतील. अनैतिक काम आणि चोरी सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तींशी भांडण, वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. आाणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल. जोडीदाराची तब्बेत बिघडेल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी झालेली मुलाखात आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांबरोबर जरा धैर्याने काम करावे लागेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात सफलता आणि यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील आणि व्यापार- धंद्यात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - आज तुमची कल्पनाशक्ती कामी येईल. बौद्धिक चर्चांमध्ये सहभागी व्हाल. त्यातून आनंद मिळेल. संततीकडून शुभ बातमी समजेल. त्यांची प्रगती होईल. मैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तींची सुखद भेट घडेल. अति विचार करून मन विचलित होईल.

वृश्चिक - आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक स्वास्थ्य बघडेल आणि मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. कुटुंबातील व्यक्तींशी जुळणार नाही त्यामुळे मन दुःखी राहील. स्थावर संपत्ती आणि वाहन इ. व्यवहाराच्या कागदपत्रावर सही करताना सावध राहा. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. म्हणून त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तब्बेत चांगली राहील आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी सुखदायक मुलाखात होईल. आणखी वाचा

मकर - मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. घरातील व्यक्तींशी मतभेद न होण्याच्यादृष्टीने ही गोष्ट आवश्यक आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयां समवेत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल तर दुसरी कडे चिंतनशक्ती व अध्यात्मशक्ती चांगली जाणवेल. दांपत्य जीवनातील गोडीचा आनंद चोखाल. आणखी वाचा

मीन - कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. आपल्या लोकांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. महत्त्वपूर्ण कागदपत्रे किंवा कोर्ट- कचेरीतील प्रकरणे यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणखी वाचा

 

Web Title: todays Horoscope 30th September 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.