Todays Horoscope 25 February 2021 | राशीभविष्य- २५ फेब्रुवारी २०२१ : कुंभसाठी आनंददायी अन् मेषसाठी चिंताजनक दिवस

राशीभविष्य- २५ फेब्रुवारी २०२१ : कुंभसाठी आनंददायी अन् मेषसाठी चिंताजनक दिवस

मेष - मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. आणखी वाचा  

वृषभ - आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा  

मिथुन - काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा  

कर्क - मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. आणखी वाचा  

सिंह - खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत काळजी घ्या. आणखी वाचा  

कन्या - वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. संततीकडून शुभवार्ता समजतील. आणखी वाचा  

तूळ - आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नती होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा  

वृश्चिक - नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीबरोबर मतभेद.  आणखी वाचा  

धनु - आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्या. पैसा अधिक खर्च होईल. आणखी वाचा  

मकर - आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. आणखी वाचा  

कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. नोकरी धंद्यात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. आणखी वाचा  

मीन - आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ.  आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 25 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.