Todays horoscope 22 November 2020 Sunday | आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2020, स्त्री मित्रांकडून मिळेल सहकार्य, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य - 22 नोव्हेंबर 2020, स्त्री मित्रांकडून मिळेल सहकार्य, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. वडीलधारे आणि स्नेही यांच्याशी संपर्क होईल आणि त्यांच्याशी व्यवहार वाढतील. अचानक धनलाभ तसेच संततीकडून लाभ होईल. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला  चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होईल.  भेटवस्तू आणि मानसम्मान मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मिथुन - मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील.  संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ करू नका. प्रतिस्पर्ध्यांशी गहन चर्चा करू नका. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून श्रीगणेश सावध राहण्याची सूचना देत आहेत. सरकारी कामात विघ्ने येतील. मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

सिंह -  मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे मनात काळजी राहील. भिन्न लिंगीय व्यक्तींची भेट होईल. त्यात सावध राहण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. तब्बेत चांगली राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. आणखी वाचा

तूळ - आपला आजचा दिवस सुखात जाईल. बौद्धिक चर्चेत दिवस जाण्याची शक्यता. आपण आज कल्पनाशक्ती तसेच सृजनात्मकशक्तीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकाल, असे श्री गणेशजी सांगतात. मुलांकडून चांगली बातमी येईल. आपली प्रगती होई आणि स्त्री मित्रांकडून सहकार्य मिळेल. आज आपण आनंदी रहाल. मात्र, येणारे अधिक विचार मन विचलित करू शकतात.

वृश्चिक - आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. स्त्रिया व वाणी यापासून भय संभवते. श्रीगणेशजी सांगतात की दस्तऐवजाच्या कार्यवाही बाबत विशेष काळजी घ्या. आणखी वाचा

धनु - गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. मित्रमंडळींशी बोलणे होईल. कामात यश मिळेल. तसेच प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. लहान प्रवास घडतील. भाग्यवृद्धी बरोबरच समाजात मान- सम्मान मिळेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मकर - आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. डोळ्यांचे त्रास. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवा असे श्रीगणेश सागतात. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे. आणखी वाचा

कुंभ - गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल.  मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. अध्यात्म आणि चिंतन यात प्रगती राहील. मित्र- आप्तेष्ट यांच्याकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. स्वजनापासून आज तुम्ही दुरच राहा कारण त्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. कोर्टाची कामे काळजीपूर्वक करा. आध्यात्मिक कार्यात सगळा दिवस जाईल. आणखी वाचा

English summary :
Todays horoscope 22 November 2020 Sunday

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays horoscope 22 November 2020 Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.