शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 07:32 IST

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष - आज चंद्र रास बदलून 20 सप्टेंबर, 2024 शुक्रवारी मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. दुपार नंतर मात्र खूप खुशीत राहाल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील. कटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यांवर खर्च होईल. स्वभाव उदासीन होईल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. आणखी वाचा

कर्क- आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामामुळे संतुष्ट राहतील. आणखी वाचा

सिंह- आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. दुपार नंतर प्रकृती नरम गरम होईल. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक- आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करावे लागेल. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान व मानहानी संभवते. दुपार नंतर मात्र मन विधायक कार्याकडे वळेल. प्रेमभावना वाढीस लागेल. आणखी वाचा

मकर- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपार नंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील. आणखी वाचा

कुंभ- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवास संभवतात. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य