Today's horoscope - 2 June 2020 rkp | आजचे राशीभविष्य - २ जून २०२० - धनुसाठी लाभाचा अन् वृषभसाठी खर्चाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २ जून २०२० - धनुसाठी लाभाचा अन् वृषभसाठी खर्चाचा दिवस

मेष
आपण आज शारीरिक आणि मानसिक स्फूर्ति अनुभवाल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातही समाधान समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

वृषभ
आज अचानक खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात संकटे येतील. मन उद्विग्न होईल. परंतु दुपारनंतर घरातील वातावरण सुख- शांतीचे असेल. आणखी वाचा

मिथुन
घरदार व जमीनजुमला या विषयाच्या कागदकामाबाबत आज दक्ष रहावे लागेल. कुटुंबियाबरोबर विनाकारण वाद होतील. संतती विषयी काळजी लागून राहील. आणखी वाचा

कर्क
अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तुम्हाला आनंदी ठेवेल. आज तुम्ही अधिक संवेदनशील बनाल. दुपारनंतर चिंतीत रहाल. आणखी वाचा

सिंह
आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. आप्तेष्टांकडून फायदा. मित्रांची भेट होईल.  आणखी वाचा

कन्या
आजचा दिवस तुम्हाला शुभफलदायी आहे. तुमच्या प्रभावी बोलण्याने तुम्ही प्रेमाचे व लाभदायक संबंध प्रस्थापित कराल. आपल्याजवळची वैचारिक समृद्धता लोकांना प्रभावीत करेल. आणखी वाचा

तूळ
आकस्मिक खर्चाबाबत सावधान रहा. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कोर्ट कचेरी पासून जरा संभाळून रहा. आणखी वाचा

वृश्चिक
आज आपल्याला अनेक बाबींत लाभ, यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागेल. परंतु त्यांच्या बरोबर फिरण्याचा आनंद मिळेल.  आणखी वाचा

धनु
आजचा आपला दिवस लाभदायी असेल. घर आणि व्यवसाय दोन्हीही क्षेत्रात आज आनंद व समाधानाचे वातावरण राहील. प्रकृती ठीक राहील. व्यवसाय धंद्यात फायदा, तसेच सरकारी कामातही लाभ होईल. आणखी वाचा

मकर
आज संपूर्ण शुभफल देणारा दिवस आहे. विदेशातून आप्तेष्टांची काही चांगली बातमी आपले मन आनंदित करेल. धार्मिक यात्रा घडेल. आणखी वाचा

कुंभ
आजचा पूर्ण दिवस आपल्यासाठी शुभ आहे. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी वाद करू नका. दुपारनंतरचा आपला वेळ मित्रांसोबत आनंदात जाईल. आणखी वाचा

मीन
आज दैनंदिन कामात शांतता मिळेल. मित्र व ओळखीच्या लोकांबरोबर जाऊन एखादया मनोरंजन स्थळाचा आनंद लुटण्याचे ठरवू शकाल. व्यापारात भागीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु दुपारनंतर आपले स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 2 June 2020 rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.