शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 07:08 IST

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष - 18 सप्टेंबर, 2024 बुधवारी मीन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृषभ - आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपार नंतर नवीन कामाचे यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल.  आणखी वाचा

मिथुन-  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल.  आणखी वाचा

कर्क- आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.  आणखी वाचा

सिंह- आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल.  आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपार नंतर दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

तूळ- लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल.  आणखी वाचा

धनु- आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. आणखी वाचा

मकर- आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र व स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा

कुंभ- आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवन शांततामय असेल. आणखी वाचा

मीन-  आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. धार्मिक व परोपकारी कार्यात मन गुंतेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य