आजचे राशीभविष्य - ०७ ऑगस्ट २०२१; ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना प्रसन्न, आनंददायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:17 IST2021-08-07T07:11:28+5:302021-08-07T07:17:56+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - ०७ ऑगस्ट २०२१; ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना प्रसन्न, आनंददायी दिवस
मेष - श्रीगणेश सांगतात आज आपला स्वभाव हळूवार बनेल ज्यामुळे कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारातून आपल्या भावना दुखावतील. आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिंतित राहाल. स्वाभिमानही दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण, झोप यात अनियमितता राहील. विद्यार्थ्यांसाठी मध्यम काळ. अधिक वाचा
वृषभ - चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज तुम्ही भावुक आणि संवेदनशील राहाल, ज्यामुळे कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र यात आज तुम्ही काम करू शकाल. कौटुंबिक सदस्य विशेषतः मातेबरोबर चांगले जमेल. अधिक वाचा
मिथुन - श्रीगणेश सांगतात की सुरवातीच्या त्रासानंतर तुम्ही ठरवलेली कामे पार पडतील ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे तुमचे कितीतरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी व्यवसायात सहकार्यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे वातावरण चांगले राहील. अधिक वाचा
कर्क - आपले मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्याबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला मिळेल तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल. शुभ समाचार व आर्थिक लाभ ही मिळतील. पत्नीबरोबर वेळ चांगला जाईल. अधिक वाचा
सिंह - श्रीगणेश आज आपल्याला कोर्ट कचेरीच्या बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे नाहीतर कोणाशी तक्राक होऊ शकते. आपण आज हळवे बनाल. अधिक वाचा
कन्या - श्रीगणेशांचा आशीर्वाद आज आपल्याला यश, कीर्ती व लाभ मिळवून देईल. लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. वाडवडील आणि मित्र यांच्याबरोबर आपला दिवस आनंदात जाईल. प्रवासही घडू शकतो. पत्नी आणि मुले यांच्याबरोबर चांगला वेळ जाईल. अधिक वाचा
तूळ - आज आपले घर आणि कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी करणार्यांना बढतीचा योग आहे. वरिष्ठ आज तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंदी व उत्साहाचे वातावरण राहील. मातृघराण्याकडून फायदा मिळेल. अधिक वाचा
वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास वाढेल. वरिष्ठ आज आपल्याशी नकारात्मक वागतील. संततीबरोबर ही मतभेद संभवतो. अधिक वाचा
धनु - श्रीगणेश म्हणतात की, आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. शस्त्रक्रिया आजच्यासाठी टाळा. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानक कोणता आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. अधिक वाचा
मकर - रोजचे काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांबरोबर फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. मोठ्या धनलाभचा योग आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इ. तून भरपूर आय राहील. मान सन्मान वाढेल. अधिक वाचा
कुंभ - कामात यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. केलेल्या कामातून यश व कीर्ती मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तनमनाला उत्साह जाणवेल. नोकरीधंद्यात सहकार्य लाभेल. मातुल घराकडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. अधिक वाचा
मीन - आज आपली कल्पनाशक्ती चमकेल. साहित्यनिर्मितीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. तुमच्या स्वभावात हळवेवणा व कामुकता राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनातः भीती असेल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. अधिक वाचा