शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलणार नाही; मोदींनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:25 IST

राज्यघटना आमच्यासाठी गीता, कुराण, बायबल : पंतप्रधान

जितू प्रधान/ सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कबाडमेर/उधमपूर : विरोधी पक्ष राज्यघटनेच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाची राज्यघटना बदलणार नाही. आपल्या देशासाठी राज्यघटना म्हणजेच गीता, कुराण, बायबल असे सर्व काही आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.राजस्थानमधील बाडमेर येथे शुक्रवारी प्रचारसभेत त्यांनी सांगितले की, एससी, एसटी यांचे नाव घेऊन भेदभाव करणाऱ्या काँग्रेसने आता राज्यघटनेचा उल्लेख करून दिशाभूल सुरू केली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत हरविले होते. त्यांना भारतरत्न हा किताब मिळू दिला नाही. याच काँग्रेसने देशात आणिबाणी लादली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घेण्यात येतील व या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले. 

काँग्रेसची राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणीराष्ट्रविरोधी शक्तींशी काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. इंडिया आघाडी भारताला दुबळे बनविण्याचे काम करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील बारमेर येथे शुक्रवारी प्रचारसभेत केला.ते म्हणाले की, काँग्रेसची विचारसरणी विकासविरोधी आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांचा काँग्रेसने कधीही विकास केला नाही. कोणतीही समस्या त्यांनी सोडविली नाही. 

काँग्रेसने अनैतिक मुलाप्रमाणे कलम ३७० चे लाड केलेnमुरादाबाद (उत्तर प्रदेश) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेसवर काश्मीर प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल हल्ला चढवला. शाह म्हणाले की, काँग्रेसने अनेक दशकांपासून “अवैध मुला” प्रमाणे कलम ३७० चे “लाड” केले. nसभेत शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. “मला सांगा, काश्मीर आपला नाही का? काँग्रेसचे खरगे हे विचारतात की, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचा काश्मीरशी काय संबंध आहे? मी सांगतो मुरादाबादचे प्रत्येक मूल काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहे. nआज आपला  तिरंगा तिथे अभिमानाने फडकत आहे, असे शाह म्हणाले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४