Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 20:34 IST2025-05-24T20:28:19+5:302025-05-24T20:34:31+5:30
rajasthan man Kills women: लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या केली.

Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे धक्कादायक घटना घडली. लग्न मोडल्याच्या रागात एका तरुणाने दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील चौकशीला सुरूवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणीचे लग्न ठरले होते. त्यांच्या साखरपुडाही झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने ढिवसाढवळ्या तरुणीच्या घरात घुसून धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. घटनेच्या दिवशी तरुणीची आई रुग्णालयात आणि वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने तरुणीची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले. तरुणीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लग्न मोडल्याच्या रागातून आरोपीने तरुणीची हत्या केली, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.