पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 03:54 PM2023-12-04T15:54:55+5:302023-12-04T15:55:51+5:30

कुठे 974 तर कुठे फक्त 321 मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव.

Rajasthan Election 2023: Sachin Pilot-Ashok Gehlot controversy hits Congress; Defeated by a very narrow margin in 20 seats | पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

Rajasthan Election 2023: काल(3 डिसेंबर) रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यात काँग्रेसने आपल्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड गमावले. राजस्थानमध्ये 2018 प्रमाणे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद नसता, तर  राजस्थानची परंपरा बदलू शकली असती. पायलट आणि गेहलोत यांच्यातील मतभेदामुळे राज्यातील 20 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. 

पायलट आणि गेहलोत यांच्यातील वादामुळे काँग्रेसला 10 हजारांपेक्षा कमी फरकाने 14 जागा गमवाव्या लागल्या. या जागांमध्ये ममता भूपेश यांच्या सिकराई, प्रमोद जैन भाया यांच्या अंता, विश्वेंद्र सिंग यांच्या डीग-कुम्हेर आणि वाजिब अली यांच्या नगर जागेचा समावेश आहे. गेहलोत यांच्याशी असलेल्या वादाणामुळे पायलट कॅम्पचेही नुकसान झाले आहे. पायलट गटाला नशिराबाद, विराटनगर आणि चाकसूमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्यातील निकाल
या 20 जागा काँग्रेसने जिंकल्या असत्या तर राज्याचे समीकरण वेगळे झाले असते, असे जाणकारांचे मत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने 115, काँग्रेसने 69, BAP 3, BSP 2 आणि RLP 1 जागा जिंकली आहे. तसेच, राज्यातील 8 जागा अपक्षांकडे गेल्या आहेत. त्यापैकी 6 अपक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात बंडखोरी करुन निवडणूक लढवली होती.

पक्षांतर्गत कलहामुळे पराभव
अंता आणि छाबरा-बारण जिल्ह्यांतील या दोन जागांवर काँग्रेसचा पराभव अंतर्गत राजकारणामुळे झाला. गेहलोत सरकारचे मंत्री प्रमोद जैन भाया अंता मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. भय्या यांचा भाजपच्या कंवरलाल मीणा यांच्याकडून 5861 मतांनी पराभव झाला. तसेच पक्षाने माजी आमदार करण सिंह यांना छाबरा येथे उमेदवारी दिली होती. करण सिंग यांचाही 5108 मतांनी पराभव झाला. येथून भाजपचे प्रताप संघवी विजयी झाले आहेत.

दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे सचिन पायलट गटाचे नरेश मीणा. या दोन्ही जागा मीणाचे वर्चस्व मानल्या जातात. निवडणुकीपूर्वी नरेश यांनी प्रमोद भायाविरोधात बंडखोरी केली होती. नरेश अंता किंवा छाबरा सीटवरून तिकीट मागत होते, पण त्यांना तिकीट मिळाले नाही. यानंतर त्यांनी मीणाने समाजाची बैठक बोलावून छाबरा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. नरेश छाबरा मतदारसंघातून विजयी झाले नाहीत, मात्र त्यांना 41 हजार मते मिळाली. नरेश यांच्यामुळे मीना मतदारांचे अंता जागेवरही ध्रुवीकरण झाले.

अतिशय कमी परकाने पराबव
पद्माराम यांचा 1428 मतांनी पराभव झाला. पद्माराम यांच्या पराभवाला स्थानिक समीकरणेही कारणीभूत आहेत. दिडवाना येथून अपक्ष युनूस खान यांनी काँग्रेसच्या चेतन दुडी यांचा 2392 मतांनी पराभव केला.  याशिवाय, हवामहल मतदारसंघात भाजपच्या बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेसच्या आरआर तिवारी यांचा 974 मतांनी पराभव केला आहे. तसेच, कोटपुतलीमधून मंत्री राजेंद्र यादव यांचा भाजपच्या हंसराज पटेल यांच्याकडून 321 मतांनी पराभव झाला. नगरमधून वाजीब अली यांना 1531 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. नसीराबादमध्येही शिवप्रकाश गुर्जर यांचा 1135 मतांनी पराभव झाला आहे. याशिवाय, इतर अनेक जागा आहेत, जिथे काँग्रेसचा भाजप उमेदवाराने अतिशय कमी फरकाने पराभव केला आहे.

Web Title: Rajasthan Election 2023: Sachin Pilot-Ashok Gehlot controversy hits Congress; Defeated by a very narrow margin in 20 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.