राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:55 AM2023-12-03T08:55:05+5:302023-12-03T08:58:34+5:30

Rajasthan Assembly Election Result 2023: सत्तेत समीकरणे कशी जुळवावी यावर बैठकांचे सत्र

Rajasthan Assembly Election Result 2023 Vasundhara camp stirs as Discussions takes place late night with RLP leader Hanuman Beniwal | राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

राजस्थानात निवडणूक निकालाआधी रात्री तीनपर्यंत 'वसुंधरा कॅम्प'मध्ये खलबतं; RLPच्या बेनीवालांशी चर्चा

Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023: राजस्थानमध्ये आज विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत स्तरावर सरकार स्थापनेची समीकरणे कशी जुळवावी यावर उहापोह सुरू आहे. निवडणूक प्रचारापासूनच एक्झिट पोलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा परिणाम खेड्यापाड्यात दिसत आहे. अपक्ष बंडखोर आणि छोट्या पक्षांना आपल्या बाजूने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तशातच शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या छावणीत बैठकांचे सत्र पाहायला मिळाले. पहाटे तीन वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या अशी माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (RLP) प्रमुख हनुमान बेनिवाल यांच्याशी संपर्क साधला आहे. यापूर्वी ते एनडीए आघाडीचा भाग होते. 2020 मध्ये शेतकरी विधेयकावरून त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरएलपीच्या उमेदवारांनी तीन विधानसभा जागा जिंकल्या होत्या.

काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की 'टक्कर'

राजस्थानमध्ये आज निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस परतणार की भाजप सरकार स्थापन करणार याचा निर्णय आज होणार आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसली आहे. राज्यातील २०० विधानसभा मतदारसंघांपैकी १९९ मतदान केंद्रांवर ५१ हजारांहून अधिक मतदान झाले. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोणाला?

एक्झिट पोलनुसार, अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार आहेत. आज तक टुडे-एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये ३२ टक्के लोकांनी त्यांची निवड केली होती. तर २१ टक्के लोकांचा असा विश्वास होता की भाजपमधील कोणीही गेहलोत यांच्यापेक्षा चांगला मुख्यमंत्री असेल. या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, देवजी पटेल, दिया कुमारी, गौरव वल्लभ आदी नेत्यांनी निवडणूक लढवली होती.

Web Title: Rajasthan Assembly Election Result 2023 Vasundhara camp stirs as Discussions takes place late night with RLP leader Hanuman Beniwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.