शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मेघवाल V/s मेघवाल; भाजपकडून पुन्हा केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 5:52 AM

गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेसचे उमेदवार मदन गोपाल मेघवाल यांचा पराभव केला होता

विलास शिवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : बिकानेर म्हटले की, चटपटीत भुजियाची आठवण येते अन् तोंडाला पाणी सुटते. येथील खाद्यपदार्थांची देश- विदेशात ख्याती आहे. याच बिकानेरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. २००४ मध्ये बॉलिवूड स्टार धर्मेंद्र हे याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. या बहुचर्चित बिकानेर मतदारसंघात यंदा भाजपकडून पुन्हा केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसने गोविंद राम मेघवाल यांना रिंगणात उतरविले आहे. 

गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेसचे उमेदवार मदन गोपाल मेघवाल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे. अर्जुनराम मेघवाल हे पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीसह निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत. कार्यकुशलता ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल लढत देत आहेत. भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गोविंद राम मेघवाल यांनी २००३ मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक जिंकली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. बसपाने येथून खेताराम मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

पाकिस्तान सीमेला हा भाग लागून आहे. पाणी, परिवहन या येथील समस्या आहेत. जयपूर, जोधपूर, कोटा, उदयपूरच्या तुलनेत बिकानेर विकासाच्या बाबतीत मागे आहे. पर्यटन क्षेत्र असूनही सोलर हब, रेल्वे सेवा विस्तार आदी प्रश्न येथे अनुत्तरीत आहेत. बेरोजगारीची समस्याही आहे.  राजा महाराजांचा कधीकाळी या ठिकाणी प्रभाव हाेता. काँग्रेस पक्ष या मतदारसंघात दरवेळी नवा उमेदवार देत आलेला आहे. या मतदारसंघातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानrajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४ElectionनिवडणूकBJPभाजपाbikaner-pcबीकानेर