पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:27 AM2023-11-24T06:27:25+5:302023-11-24T06:28:39+5:30

मुख्यमंत्री बनविण्याचे वचन माेडल्याची भावना, पाठिंबा देण्यावरून स्थानिकांमध्ये मतभिन्नता

Faction in Gurjar community after Pilot-Gehlaet dispute | पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

अलवर : काॅंग्रेस नेते सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे राजस्थानातील गुर्जर  याबाबत समाजातील नेत्यांमध्ये पक्षाला पाठिंबा देण्याबाबत मतभिन्नता दिसून येते. गेल्या निवडणुकीनंतर यावेळी हा समाज पायलट यांना मुख्यमंत्री झालेले पाहू इच्छिताे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही प्रचाराच्या शेवटी या मुद्द्यावरून काॅंग्रेसवर टीका केली.

राजस्थानातील २०० पैकी ३५ मतदारसंघ गुर्जरबहुल मानले जातात. अलवरमध्ये सुमारे दीड लाख लाेक या समाजातील आहेत. सचिन पायलट यांच्यावरून या समाजातील मतदार नाराज तर आहेत. मात्र, केवळ काॅंग्रेसच त्यांना मुख्यमंत्री करू शकते, असेही लाेकांचे म्हणणे आहे. समाजातील मतदार नाराज असले तरीही काॅंग्रेसला मत देण्याबाबतच्या निर्णयावर याचा परिणाम हाेणार नाही. भाजप पायलट यांना मुख्यमंत्री बनविणार नाही, असे स्थानिक निवासी अमरसिंह गुर्जर सांगतात. काॅंग्रेसचे सरकार आल्यास पायलट हे मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

वचनभंगामुळे नाराजी
पायलट यांना मुख्यमंत्री न बनवून काॅंग्रेसने वचनभंग केला, असे समाजातील अनेक जण मानतात. गेल्या वेळी याच वचनामुळे समाजाने काॅंग्रेसला मतदान केले हाेते. त्यामुळे यावेळी काॅंग्रेसचे नुकसान हाेणार असून माेठ्या संख्येने गुर्जर मते भाजपला मिळतील, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.

असाही मतप्रवाह
गुर्जर समाज सचिन पायलट यांना 
नेता मानताे. स्थानिक समस्या साेडविण्यासाठी सचिन पायलट येणार नाही, त्यासाठी स्थानिक नेताच येईल. आमच्या येथे प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता काेणाकडे आहे, या आधारावर मतदान करू, असाही मतप्रवाह आहे.

विकासकामे पाहू
सचिन पायलट तरुणांचा चेहरा आहे. नव्या पिढीचे नेते आहेत. आम्ही नेत्यांनी केलेल्या विकासकामाकडेही पाहून मतदान करू. गुर्जर समाज हताश झालेला नाही, असे या समाजातील लाेक म्हणतात.

मतांचे हाेईल विभाजन?
राजस्थानमध्ये पायलट यांनीच पक्ष बळकट केला. त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले नाही. यामुळे काॅंग्रेसचे नुकसान हाेईल. समाजातील मते भाजपकडे वळतील, असे स्थानिकांचे मत आहे.

Web Title: Faction in Gurjar community after Pilot-Gehlaet dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.