‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 09:38 AM2023-10-27T09:38:19+5:302023-10-27T09:39:42+5:30

अनेक उमेदवार बदलले

bjp planned a special strategy for those 35 seats focus on constituencies won lost by narrow margins in rajasthan assembly election 2023 | ‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : राजस्थानमध्ये भाजपने राज्यातील ३५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गत निवडणुकीत भाजपने अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने १८ जागा जिंकल्या, तर १७ जागा हरल्या होत्या. भाजपने ७ उमेदवारांचे तिकीट नाकारले, तर ९ जागांबाबत विचार सुरू आहे.

कुठे बदलले उमेदवार? 

सूरजगड, मकाराना, चुरू, घाटोल, फतेहपूर, दांतारामगड, बांदीकुई

पुन्हा उमेदवारी कुठे? 

पिलीबंगा, मंडावा, चौमू, फुलेरा, मालवीय नगर, ब्यावर, सिवाना, गोगुंदा, आसिंद, बुंदी, छबडा, खानपूर, चाकसू, परबतसर, नावां, पोखरण, चौहटन, सागवाडा, सांगोद 

या मतदारसंघात अद्याप खलबते सुरू

राणीवाडा, खेतडी, खंडेला, नदबई, मसुदा, मारवाड जंक्शन, पचपदरा, बेगूं, भीम.

‘टोळधाडीसारखा ईडीचा वापर; त्यांचेच पीक होईल उद्ध्वस्त’

भाजपकडून ईडीचा वापर हा टोळधाडीसारखा केला जात आहे. या कारवाईमुळे काँग्रेस पक्ष व नेते घाबरणार नाही. परंतु, निवडणुकीचा निकाल आल्यावर भाजपचे पीक उद्ध्वस्त होईल, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.  पेपरलिकप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि महुआ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनाही नोटीस बजावण्यात आल्यावर गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. भाजपने यापूर्वी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, मणिपूरमध्ये गैरप्रकारे सरकार स्थापन केले. परंतु राजस्थानमध्ये त्यांची डाळ शिजली नाही, असे गेहलोत म्हणाले.

 

Web Title: bjp planned a special strategy for those 35 seats focus on constituencies won lost by narrow margins in rajasthan assembly election 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.