शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवा गडी, नवं राज्य! राजस्थानातही भाजपाचा 'दे धक्का'; भजनलाल शर्मा झाले मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:25 IST

चर्चेत असलेल्या वसुंधरा राजे यांचा 'पत्ता कट'

Bhajanlal Sharma, New Rajasthan CM : राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला असून सांगानेर मतदारसंघातून आमदार झालेले भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीतील निरीक्षकांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भजनलाल शर्मा यांचे नाव निश्चित केले. राजस्थानसह तीन राज्यात भाजपाने भरघोस यश मिळवले. त्यानंतर विविध राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी काही नावे चर्चेत होते. काल मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना 'धक्का' देत मोहन यादव यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हेच धक्कातंत्र आजही कायम ठेवत भाजपाने राजस्थानमध्येही साऱ्यांना आश्चर्यचकित केले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे नाव चर्चेत असताना भाजपाकडून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोण आहेत भजनलाल शर्मा?

भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे अनेक दिवसांपासून पक्षसंघटनेत कार्यरत आहे. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या अतिशय सुरक्षित आणि भाजपाच्या हक्क्वाच्या अशा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले. तेथून जिंकून ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि मुख्यमंत्रीपदीही विराजमान झाले. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते ४ वेळा प्रदेश सरचिटणीस राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविप यांच्याशी संबंधित आहेत. सांगानेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला आहे. तेथून भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

पर्यवेक्षकांच्या बैठकीत घेतलेला निर्णय

भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज दुपारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची वसुंधरा राजे यांच्याशी वन टू वन बैठक झाली. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर नावाची घोषणा करण्यात आली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा