शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना एकाच छताखाली ‘भरोसा’, न्याय मिळण्यात मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 23:46 IST

रायगड पोलिसांचा उपक्रम : न्याय मिळण्यात मदतीचा हात

निखिल म्हात्रे

अलिबाग : हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जाणार आहे. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मकपणे काम करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले.

भरोसा सेल हे पीडित महिला व मुले यांच्या तक्र ारी स्वीकारण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. रात्री-बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात येते. तसेच १०० या महिला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून त्या संबंधित तज्ज्ञांकडे तत्काळ पाठविण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्र ारींचे वर्गीकरण करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. संबंधित तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात येते. भरोसा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्र ारींमधील पीडित व्यक्तीस न्याय मिळत नाही तोपर्यंत तक्र ार बंद करून कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही. भरोसा सेल अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण तसेच विधिविषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाइन, महिला हेल्पलाइन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पीडित महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश आहे.हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करूनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास निश्चित मदत होत आहे. तसेच महिलांनी आत्मनिर्भर राहावे. कारण कुठलाही प्रसंग सांगून येत नाही. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील योग्य ती माहिती घेऊन निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे काळाची गरज आहे.- अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगडसमुपदेशनाद्वारे तक्र ारींचे निवारणच्लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी काही वेळा दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा कुटुंबीयांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारीरिक व मानिसकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा आणि घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात.च्पोलीस स्टेशनला तक्र ार न देताही भरोसा सेलमध्ये तक्र ार नोंदविता येणार आहे. पीडित महिलेला समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधिविषयक सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाते. यातून त्यांचा वेळ, पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल.च्भरोसा केंद्रात तक्र ारीविकल, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांसोबतच स्थानिक भरोसा सेलमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक साहाय्यक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकासह कर्मचारीसुद्धा नियुक्त आहेत. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. _हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविण्यात आला होता. याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडWomenमहिला