शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा परिसरातील रस्त्यालगत अवतरले वन्यप्राणी, पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 23:37 IST

संडे अँकर । प्रवाशांबरोबर पर्यटकांना सेल्फी पॉइंट : थ्रीडी चित्रांनी रस्त्यावर अभयारण्याचा होणार भास

अरुणकुमार मेहत्रे।

कळंबोली : २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील कर्नाळा अभयारण्यही त्यात लॉकडाऊन झाले आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत कर्नाळा अभयारण्य परिसरात जंगलातील बिबट्या, हरीण, फुलपाखरू, फालकन पक्षी, कर्नाळा किल्ला, वाघ या प्रण्यांचे थ्रीडी चित्र रेखाटण्यात आल्याने पर्यटकांना लॉकडाऊननंतर पाहण्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे.यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून न जाता अभयारण्यातून गेल्याचा भास होणार आहे. त्याचबरोबर सेल्फी पॉइंट विकसित करण्यात आला आहे.

पनवेल शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारच्या वृक्षवेलींबरोबर प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य आहे.लॉकडाऊनचा फायदा घेत वनक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून थ्रीडी चित्र रेखाटण्यात आले आहे. अभयारण्य परिसरात अगोदर ११ मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो आता ३० मीटर रुंदीचा झाला आहे. त्यामुळे अभयारण्य प्रवेशद्वारापासून महामार्ग उंचावला गेला आहे. अभयारण्य परिसरातील वळणावरून वाहने खाली जाऊ नयेत म्हणून १४ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या संरक्षक भिंतीचा उपयोग करून या भिंतीवरच चित्रकार रवी साटम आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ही चित्रे साकारली आहेत. बिबट्या, हरीण, वाघ, स्वर्गीय नर्तक, फालकन पक्षी, कर्नाळा किल्ला, वाघ, फुलपाखरू, माकड, मोर, विविध झाडे, वृक्षवेली, लहान मुले, प्राणी आणि पक्ष्यांची थ्रीडी चित्रे साकारण्यात आली आहेत.त्याचबरोबर वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात घालू नका. जर तुम्ही निसर्गावर प्रेम केले तर आपल्याला निसर्गाचे सर्वच सौंदर्य पाहायला मिळेल. जर झाडांनी आॅक्सिजनऐवजी वायफाय दिला असता तरङ्घप्रत्येकाने एक तरी झाड लावले असते, अशी चित्रांसह सुविचारांची पेरणी केली आहे.६ लाख खर्चथ्रीडी चित्रे तसेच इतर कामासाठी ६ लाख खर्च करण्यात आला आहे. बाहेरील भिंतीवरील चित्रांकरिता अडीच लाख खर्च करण्यात आला आहे. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेला कलर पाण्यात धुतला जात नाही. त्यामुळे पावसातील पाणी व उन्हाळ्यातील तापमानात चित्रातील कलर उडणार नाही.प्रवेशद्वारापासून ते अभयारण्यात जाणाºया मार्गावर काय काय पाहाल, कुठल्या स्थानावरून कोणते प्राणी व पक्षी दिसतील याची माहिती, किल्ला, प्राणी व पक्षी यांची माहिती, रोपट्यापासून झाडांची निर्मिती कशी होते याविषयी १८ फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Raigadरायगडenvironmentपर्यावरण