शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

विजेचे १०० कोटी गेले कुठे?; अलिबागकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:40 PM

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास बिल न भरण्याचा इशारा

अलिबाग : ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकारने तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र तरीही तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण असून दैनंदिन कामांचा खोळंबा होत आहे.सोमवारी शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सेना पदाधिकाºयांनी फैलावर घेतले. पुढील सात दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांना दिले.महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला आहे, मात्र तरीही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. सातत्याने खंडित वीजपुरवठा करणाºया अलिबागच्या महावितरण विभागाला रॉकेलचा पेटता दिवा शिवसेनेने भेट म्हणून देत अनोखे आंदोलन केले.वीज वाहक तारा, गंजलेले खांब, डीपी, सब स्टेशनमधील दुरुस्तीसाठी सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. असे असताना महावितरणकडून आवश्यक साधनांचा पुरवठा कर्मचाºयांना होत नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजा केणी यांनी केला.१०० कोटी रुपयांच्या निधीतून कोणत्या प्रकारची कामे केली जाणार आहेत? कोणत्या विभागामध्ये किती कामे केली जाणार आहेत? कामाचे नियोजन आणि निधीचा होणारा विनियोग यांची सुस्पष्ट माहिती लेखी स्वरूपात द्यावी तसेत ढासळलेल्या वीजपुरवठ्याबाबत सुधारणा झाली नाही तर विजेचे बिल भरणार नाही असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये लवकरच सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी केली.महावितरणच्या अखत्यारीत असणाºया सब स्टेशनमध्ये सहायक अभियंता, वायरमन, लाइनमन यांची पदे रिक्त आहेत. ती तातडीने भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली.पावसाळ््यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणचा कारभार उघडकीस आला. दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, खांब कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजalibaugअलिबाग