पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

By वैभव गायकर | Published: September 30, 2023 05:34 PM2023-09-30T17:34:27+5:302023-09-30T17:34:40+5:30

पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली.

Wheel of freight train derailed at Panvel station Fortunately there were no casualties | पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

googlenewsNext

पनवेल: पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना दि.30 रोजी दुपारी 3 वाजुन 5 मिनिटांनी घडली .कळंबोली ते पनवेल या स्टेशनच्या दरम्यान घडली असून ही ट्रेन पनवेलहून वसईकडे निघाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पनवेलजवळ झालेल्या या मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी एक्सप्रेसची वाहतूक मात्र ठप्प झाली होती. या रेल्वे अपघाताचा उपनगरीय सेवेला कोणताही फटका बसलेला नसून ही सेवा सुरळीत पने सुरु आहे. या मालगाडीमध्ये लोखंडी कॉईल असल्याने ते बाजूला काढून डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे मोठे आवाहन रेल्वे प्रशासनासमोर आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले.या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.या अपघातामुळे या मार्गावरून  गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली ,मंगळुरु एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल- सावंतवाडी, इंदूर एक्स्प्रेस, एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस आदी गाड्या वेगवेगळ्या स्थानकात थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या.

Web Title: Wheel of freight train derailed at Panvel station Fortunately there were no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.