शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या! पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक गेला चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:13 IST

आम्ही न्याय मागायचा कुणाकडे?? शेतकरी हतबल

कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ: तुमच्या गायीने खोंडाला जन्म दिला असेल, तर त्याच्या जन्माची नोंद जरूर करा. कारण, भविष्यात जर ते चोरीला गेले तर त्याचा शोध घेण्यासाठी या जन्माच्या दाखल्याची गरज पडेल. आता त्याच्या जन्माची नोंद कुठे करायची आणि दाखला कोण देणार, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर शोधायला कर्जतपोलिस चौकीत यावे लागेल. कारण, बैल चोरीला गेला म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यालाच कर्जत चौकी पोलिसांनी बैलाच्या जन्माचा दाखला कुठाय?, असा अजब प्रश्न विचारल्याने शेतकरीही चक्रावले आहेत.

कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याचा बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणातूनच पळवून नेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला खेचत आलिशान वाहनात बसवताना स्पष्ट दिसत आहेत. सकाळी उठल्यावर माळी यांना बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ कशेळे पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली, मात्र तेथे तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे शेतकरी कर्जत पोलिस ठाण्यात आला. तेथे पोलिसांनी शेतकऱ्याला चोरीला गेलेल्या बैलाचा जन्मदाखला आणा, असे सांगताच शेतकरी आगतिकपणे फक्त पाहतच राहिला. शेतकऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात गोतस्करांचा दबदबा वाढल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.  

आम्ही न्याय मागायचा कुणाकडे??

माझं पीक गेलं, बैलही गेला आणि न्याय मागायला गेलो, तर पोलिस दाखला मागतात. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल शेतकऱ्याने केला आहे.

प्रशासन व पोलिस यंत्रणा यावर तातडीने कारवाई करणार, की आणखी एखाद्या शेतकऱ्याचा बैल चोरीला जाण्याची वाट बघणार, असा सवालही उपस्थित होत शेतकरी संघटनांनी उपस्थित केला असून, याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चोरीला गेलेल्या बैलाचा जन्मदाखला मागणारे पोलिस शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, याप्रकरणी कशेळी पोलिसांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

अवकाळीने गिळले रान, जनावरांवर चोरट्यांचा डोळा

एकीकडे परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले, भात पिके पाण्यात बुडाल्याने शेतीसह शेतकऱ्यांचा संसारही  उद्ध्वस्त झाला. शासनाने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यातच तालुक्यात गोतस्करांचे थैमान सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ-कोदीवले परिसरात तस्करांनी शेतकऱ्याचा बैल कापून त्याचे मांस विक्रीसाठी नेल्याचे प्रकरण उघड झाले होते. आता पुन्हा अंजपमध्ये ही घटना घडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Stolen bull? Produce birth certificate! Police puzzle farmer with strange demand.

Web Summary : A farmer in Karjat was shocked when police demanded a birth certificate for his stolen bull. The farmer reported the theft after CCTV footage showed the bull being taken. Farmers are angry, questioning where to seek justice.
टॅग्स :RobberyचोरीKarjatकर्जतPoliceपोलिस