शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या दिवशी आरटीओ कॅम्प

By admin | Updated: July 25, 2015 22:42 IST

महाडमध्ये ऐन सुट्टीच्या दिवशी आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याने कॅम्पला नागरिकांची किरकोळ हजेरी दिसून आली. यामुळे इतर दिवशी जमा होणाऱ्या महसुलाच्या

 दासगाव : महाडमध्ये ऐन सुट्टीच्या दिवशी आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याने कॅम्पला नागरिकांची किरकोळ हजेरी दिसून आली. यामुळे इतर दिवशी जमा होणाऱ्या महसुलाच्या रकमेपेक्षा निम्मी रक्कमच जमा झाल्याने या कॅम्पचा ना सरकारला फायदा झाला ना नागरिकांना. चौथा शनिवार सुट्टी असून दुसऱ्या दिवशी रविवार लागल्याने आता कॅशिअरला जमा रक्कम बँकेत भरणा करणे शक्य होणार नसल्याने जमा रक्कम सांभाळण्याचा धोका या कॅशिअरला पत्करावा लागणार आहे. शनिवारी महाडमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेणमार्फत आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक आरटीओ कॅम्पला महाडमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र २५ जुलै रोजी चौथा शनिवार असल्याने गर्दी जमा झाली नाही. सुट्टीच्या दिवशी लावलेल्या या कॅम्पचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशी कॅम्प असेल तर सुमारे दोन ते अडीच लाखचा महसूल गोळा होतो. मात्र २५ जुलैच्या कॅम्पच्या दिवशी निम्मी रक्कमही गोळा होणार नाही हे उपस्थितीवरून दिसून येत होते. आरटीओ कॅम्पमध्ये नवीन परवाना काढणे, परवाना नूतनीकरण, चालक लायसन्स, वाहन नोंदणीकरण आदी कामे केली जातात. इतर दिवशी कॅम्पला मोठी गर्दी होते. २५ जुलै रोजी झालेल्या कॅम्पला तुरळक गर्दी दिसून आली. यामुळे शासनाच्या झालेल्या नुकसानीस आणि नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेता कॅम्पचे आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. याठिकाणी जमा झालेली रक्कम शासकीय नियमानुसार बँकेत भरणा होणे अपेक्षित आहे, मात्र शनिवार असल्याने बँक देखील दुपारीच बंद झाली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने जमा झालेली शासकीय रक्कम ही कॅशिअरला धोका पत्करून स्वत:कडे सांभाळावी लागणार आहे. अशाच प्रकारे पुढे गणपती आणि दिवाळीमध्ये सुट्टीच्या दिवशी कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाडच्या आरटीओ कॅम्पमध्ये चर्चेदरम्यान समोर आली. (वार्ताहर) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कॅम्पचे आयोजन केले आहे. - एच. डी. काल्हेकर, मोटार वाहन निरीक्षक. महिना पूर्ण झाला की पुढील दिवशी कॅम्पचे आयोजन केले जाते. यामध्ये आम्ही महिना अ‍ॅडजस्ट करतो. जमा झालेली कॅश कॅशिअर सांभाळेल. - एस. एच. कामत, डेप्युटी आर. टी. ओ.