शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

आकाशगंगा पर्यटकांच्या भेटीला

By admin | Updated: May 11, 2017 02:06 IST

आकाशातील सूर्य,चंद्र,ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळत होती, परंतु आता माथेरानमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : आकाशातील सूर्य,चंद्र,ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळत होती, परंतु आता माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ही माहिती दुर्बिणीच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे आणि ते फक्त माथेरान गिरीस्थान नगरपरिषद निर्मित अवकाश निरीक्षण केंद्रातून, यामुळे पर्यटनाबरोबर खगोल शास्त्राचा सुद्धा अभ्यास करण्याची पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहे.नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून आणि खगोल शास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनातून या केंद्राची निर्मिती केली आहे. यामध्ये अवकाशाच्या निरीक्षणाबरोबरच थ्रीडी थिएटरचा आनंद सुद्धा मिळणार आहे. याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ८ मे रोजी येथील पेमास्टर पार्कजवळील अग्निशमन इमारतीमध्ये करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता या उपक्र माचे उद्घाटन माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दीपप्रज्वलनाने केले. याप्रसंगी व्हिजबल लाइट खगोल शास्त्राचे अभ्यासक प्रदीप नायक, पार्टिकल अक्सीलेटर खगोल अभ्यासक डॉ.अभय देशपांडे, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक प्रसाद सावंत, शिवाजी शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ९ मे ते १४ जून पर्यंत याचा आनंद पर्यटकांना मोफत घेता येणार आहे. तसेच थ्रीडी थिएटरच्या माध्यमातून विज्ञान विषयक माहितीपट, एस्ट्रोनॉमी, लहान मुलांसाठी डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. यासाठी नासाने निर्मित केलेल्या दुर्बिणीतून अभ्यास करण्याची पर्यटकांना जणू पर्वणीच ठरणार आहे. या उपक्र माला नगरपरिषदेने आकाशगंगा असे नाव दिले आहे. असा उपक्र म करणारी माथेरान नगरपरिषद ही देशातील पहिली नगरपरिषद म्हणून ओळखली जाणार आहे.हा उपक्र म माथेरानमध्ये व्हावा यासाठी रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी दिला आणि तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नाने हा उपक्र म झाला म्हणून प्रसाद सावंत यांनी दोघांचे आभार मानले. हा कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी आकाश निरीक्षण केंद्राचे संचालक शैलेश संसारे,नगरपरिषद अभियंता देवेंद्र मोरखंडीकर, संदेश कदम, अन्सार महापुळे, विकास पार्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.