शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा शहरात वाहतूककोंडीची समस्या

By admin | Updated: May 10, 2017 00:19 IST

रेवदंडा-अलिबाग मुख्य हमरस्त्यावर बाजारपेठ असून येथील रस्ता अरुंद आहे, तसेच येथे दुतर्फा हातगाड्या व्यावसायिकांचे वाढते प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्करेवदंडा : रेवदंडा-अलिबाग मुख्य हमरस्त्यावर बाजारपेठ असून येथील रस्ता अरुंद आहे, तसेच येथे दुतर्फा हातगाड्या व्यावसायिकांचे वाढते प्रमाण, गावात भाजी मार्केट नसल्याने मुख्य रस्त्यावर पंचक्र ोशीतील महिला भाजी, फळे, रानमेवा विक्रीसाठी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी ही समस्या जटील रूप धारण करत आहे. याचा सर्वात मोठा फटका पादचारी वर्गाला बसत आहे. काही दुकानदारांनी विक्र ी करण्याच्या वस्तू रस्त्यावर थाटल्याने वाहतूक सुरळीत चालू राहण्यास अडथळा ठरत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.मुरुड-जंजिरासारख्या प्रति गोवा मानल्या गेलेल्या ठिकाणी बारमाही येणाऱ्या पर्यटकांना याच हमरस्त्यावरून जावे लागते. पंचक्र ोशीतील सुमारे ७० गावातील नागरिकांना रेवदंडा येथे बँक, पोलीस ठाणे,वैद्यकीय सेवा तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा घेण्यासाठी यावे लागते. अनेक नागरिक स्वत:चे वाहन घेऊन येतात, मात्र अरुंद रस्ते व गावात अधिकृत कुठेच वाहनतळ नसल्याने ही वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. मग बाजारपेठेत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीत सर्वात जास्त फटका बसतो तो मुरुड-जंजिरा व अलिबाग आगारातील बसला. वाहतूक कोंडीत बस अडकल्या की त्यांना नियोजित स्थानकात पोचण्यासाठी उशीर होतो. पर्यायाने बसचे वेळापत्रक कोलमडते, याचा अनुभव दररोज प्रवासी घेत असतात. रस्त्यावर वाढणारे हातगाडी विक्रे ते यांच्यावर ग्रामपंचायतीने पोलीस खात्यामार्फत कारवाई केली, अनेक ग्रामसभांमध्ये याविषयी चर्चा झाली, मात्र कायमस्वरूपी प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.