लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 06:38 IST2024-06-20T06:37:51+5:302024-06-20T06:38:29+5:30
अपघातात एक जण ठार, तर ११ प्रवासी जखमी झाले आहेत.

लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क , पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या लग्झरी बसला भरधाव ट्रेलरने धडक दिली. ही घटना बुधवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण ठार, तर ११ प्रवासी जखमी झाले आहेत.
घाटकोपर-कामथे येथील कदम ट्रॅव्हल्सची लग्झरी बस पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर प्रवाशांना उतरण्यासाठी थांबली होती. त्यावेळी महाडकडून भरधाव आलेल्या ट्रेलरने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघाात रवींद्र यशवंत सकपाळ (५६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालक शुभम दीपक दरेकर (२६), चालक विश्वनाथ विठ्ठल उतेकर (वय ३२), संतोष गेनू केसरकर (४८), महादेव सखाराम गोगावले (५५), ओंकार चंद्रकांत सकपाळ (२४), नारायण श्रीपत सणस (७२), सूरज सखाराम जाभडे (३०), निखिल रवींद्र सकपाळ (३०), विष्णू तुकाराम सणस (६०), जनाबाई सुरेश सलीमकर (४३), चंद्रकांत तुकाराम गोगावले (५९) हे जखमी झाले.
सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.