शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

पर्यटकांनी घेतला कोरोनाचा धसका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 1:20 AM

दोन आठवड्यांत ६५ टक्के पर्यटक घटले; हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक चिंतेत

संजय करडे

मुरुड : रायगड जिल्ह्याला ३२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. उंच नारळ सुपारीच्या बागा या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. मुंबईपासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर तर सागरी प्रवासाने जवळ असे अंतर झाल्याने येथे दर शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी रेलचेल असते.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच लुभावत असतात. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त शनिवार व रविवार या दोन दिवसात एक लाखापेक्षा जास्त लोक येऊन जात असतात. दोन दिवसात पर्यटक स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध करून देतात. हजारो हॉटेल व्यावसायिक व लॉजिंग सर्वत्र हाऊसफुल्ल असतात; परंतु मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांची संख्या कमालीची रोडवल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायाची चिंता वाढली आहे. सर्व लॉजच्या रूम फुल्ल असावयाच्या; परंतु आता फक्त किमान दोन रूमच जात आहेत. तेच चित्र हॉटेलवाल्यांचेसुद्धा दिसून येत आहे. भोजनाचे सर्व बेंच फुल असायचे. असंख्य पर्यटक वेटिंगवर असावयाचे; परंतु आता येथेसुद्धा खूप कमी पर्यटक येत असून, बेंच उपलब्ध आहेत; परंतु पर्यटक नाहीत.

कंटाळलेले हौशी पर्यटक कामात बदल म्हणजे विश्रांती, या सूत्रानुसार चार दिवस आरामात निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, काशिद बीच, मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरि हरेश्वर या ठिकाणी  पर्यटक गर्दी करीत असत. मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. १ मार्च पूर्वीच कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याने शासनाने पुन्हा लॉकडाऊन आणला तर विनाकारण अडकून पडू, या अनामिक भीतीमुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

मागील दोन आठवड्यात पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे व्यवसायात मोठी घट आली आहे. वास्तविक पहाता मुरुड तालुका हा कोरोनामुक्त आहे. येथे कोणतेही रुग्ण नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडला कोणतीही भीती न बाळगता आले पाहिजे.- विनायक धुमाळ, हॉटेल-लॉजिंगचे मालक

टीव्हीवर कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे आगाऊ बुकिंग होती; परंतु त्या अचानक रद्द करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन आठवड्यात २५ टक्केसुद्धा व्यवसाय झालेला नाही.-मनोहर बैले, लॉज मालक

मुरुड शहरात पर्यटकांची गर्दी फेब्रुवारी अखेर मोठ्या संख्येने होती. स्वाभाविक स्थानिक व्यावसायिकांची कमाई चांगली होती. समुद्र किनाऱ्यावरील पाव-वडा सेंटर, शहाळे पाणी, स्नॅक्स, पाणीपुरी, भेलपुरी, उपहारगृहे विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार फुलून गेल्याने पर्यटन व्यवसाय तेजीत होता.

पर्यटकांनी पर्यटनस्थळाला भेट न दिल्याने पर्यटन व्यवसायाला अचानक ब्रेक लागल्याची स्थिती पहावयास मिळते आहे. समुद्र किनारी असणारे वॉटर स्पोर्ट, घोडागाडी, उंट सफर, बोटींग व्यवसाय थंड पडले आहेत. त्यातूनच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने लॉकडाऊनच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने पालक घरात राहून मुलांचा अभ्यास घेत आहेत.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची संख्या ७० टक्के घटलीnऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या ७० टक्के घटली असून, राजपुरी बंदरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या शिडाच्या होड्यांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. nप्रवासी बोटचालक संघटनेचे पदाधिकारी जावेद कारबारी यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रत्येक शुक्रवारी पर्यटकांच्या बोटीतून जाण्यासाठी उड्या पडतात; मात्र या शुक्रवार, शनिवार व रविवारी १४ शिडाच्या होडीला पर्यटकांअभावी रिकामे परतावे लागले. इतकी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raigadरायगड