शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पाघोळी विहीर योजना

By admin | Updated: July 25, 2015 04:00 IST

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे

आविष्कार देसाई,अलिबागरायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे. पेण तालुक्यातील ३४ गावांसाठी सुमारे तीन कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची १०० टक्के मदत जागतिक बँक करणार आहे. त्यामुळे ६०० पाघोळी विहिरींच्या माध्यमातून सुमारे पाच हजार नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी वर्षभरासाठी उपलब्ध होणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही पेण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करोडो रुपयांचा दरवर्षी चुराडा होतो. हजारो मिलीमीटर पावसाची नोंद होऊनही जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यापासून पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी ही जीवनावश्यक गरज असल्याने सरकार प्रशासनामार्फत करोडो रुपये खर्च करून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करते. मात्र हे दुष्टचक्र सातत्याने सुरूच असून ते भेदण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत गाव, वाड्या आणि वस्त्यांवर पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारने पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी जागतिक बँक १०० टक्के अर्थसहाय्य करणार आहे.जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत एकूण ६३ गावांचा समावेश आहे. त्यापैकी पेण तालुक्यातील ३४ गावांचा समावेश पाघोळी विहीर योजनेसाठी करण्यात आला आहे. त्यानंतर इतर टंचाईग्रस्त तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही योजना उत्तम असून वर्षभर पिण्याचे पाणी याद्वारे उपलब्ध होईल, असे साळुंखे यांनी सांगितले.