रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 23:55 IST2025-08-31T23:46:37+5:302025-08-31T23:55:05+5:30
रायगडमध्ये एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांचाही समावेश आहे.

रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
रायगडमध्ये एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांचाही समावेश आहे. हा अपघात म्हसळा तालुक्यातील खामगाव जवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंत हे रिक्षा घेऊन गोरेगावच्या दिशेने जात होते. या रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. यावेळी गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई या दरम्यान त्यांच्या वाहनाचा ब्रेक फेल झाला. यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला आदळले.
या अपघातामध्ये रिक्षा चालक संतोष सावंत यांचा मृत्यू जागीच झाला.सावंत हे ठाकरे गटाचे शाखा प्रमुख होते. या रिक्षामधील शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे हे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाख करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला.