शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलनगर परिसरात दोन दिवस पाणी नाही!

By admin | Updated: April 17, 2017 04:33 IST

नगरपरिषद हद्दीत संपूर्ण विठ्ठलनगर आणि कोतवालनगरच्या काही परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आॅप्टिकल फायबर केबल टाकताना तुटली

कर्जत : नगरपरिषद हद्दीत संपूर्ण विठ्ठलनगर आणि कोतवालनगरच्या काही परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आॅप्टिकल फायबर केबल टाकताना तुटली. त्यामुळे दोन दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांचे हाल झाले.कर्जत शहरातील अभिनव ज्ञानमंदिर शाळा या रस्त्यावर आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना रस्ता खोदण्यात आला असून, रस्त्याच्या या बाजूकडून दुसऱ्या बाजूला केबल नेण्यासाठी ड्रील मारून ही केबल पलीकडे टाकली जाते. मात्र, या संबंधित यंत्रणेने नगरपरिषद किंवा अन्य कोणाला विचारात न घेतल्याने केबल टाकण्यासाठी ड्रील मारले व त्यामधून केबल टाकली. सकाळी जेव्हा नगरपरिषदेने पाणी सोडले त्यावेळी या रस्त्यावर पाणीच पाणी झाले. पाणी साठलेल्या ठिकाणी खोदकाम केल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पाच इंचाच्या जलवाहिनीमधून दोन आॅप्टिकल फायबर केबल गेल्या होत्या, त्यामुळे ही जलवाहिनी तुटली होती. ही घटना १३ एप्रिल रोजी घडली. या पाच इंचांच्या जलवाहिनीला दुसरा तुकडा जोडण्यासाठी नगरपरिषदेकडे पाच इंचांची जलवाहिनी नसल्यामुळे केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर ही जबाबदारी टाकली. मात्र, ही पाच इंचांची जलवाहिनी कुठे मिळत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी गेला. या दोन दिवसांत १४ आणि १५ एप्रिलला विठ्ठलनगर व कोतवालनगरमधील काही भागांतील नागरिकांची खूपच गैरसोय झाली. हे केबल टाकण्याचे काम केंद्र सरकारचे असल्याने प्रत्यक्ष केबल टाकताना नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीची परवानगी बंधनकारक नाही किंवा रस्ता खोदण्याचे पैसे भरणे बंधनकारक नाही, असे परिपत्रक नगरपरिषदकडे असल्याने नगरपरिषद प्रशासन गप्प आहे. (वार्ताहर)