शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:38 IST

Maharashtra Politics: सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे आमदार असा सुप्त राजकीय संघर्ष महायुतीमध्ये कोकणात दिसत आहे. भरत गोगावले यांच्यानंतर आता महेंद्र थोरवेंनीही तटकरेंवर घणाघाती टीका केली.

Shiv Sena NCP News: 'लोकसभेला शिवसेनेच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे तटकरेंना मदत केली, पण विधानसभेला प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं. खरंतर राजीनामा आम्ही नाही, तुमच्या नेत्याने (सुनील तटकरे) नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे', अशा शब्दात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रायगडमध्ये आयोजित शिवसेनेच्या एका कार्यक्रमात कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंवर सडकून टीका केली. त्यामुळे कोकणामध्ये महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाची तीव्रता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

तटकरेंनी राजीनामा दिला, तर मी सुद्धा देईन

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, "तुमच्या नेत्याने (सुनील तटकरे) राजीनामा दिला, तर मी नक्कीच देईन. माझी द्यायची तयारी आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊद्या. तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे राजीनामा द्यायची, तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या. त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरं जाईन. तयारी आहे का, जाऊन विचारा", अशी टीका महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केली. 

वाचा >>राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

"पत्रकार परिषद घेतात. कोल्ह्या कुत्र्यांची पत्रकार परिषद. आम्ही खूप काही शांत पद्धतीने सहन करत आलेलो आहे. बदनामी... किती बदनामीला सामोरं जाणार? तोंडात येईल ते बोलत आहेत. मनाला वाटेल ते पत्रकार परिषदेत जाऊन बोलत असतात. आता पत्रकारांनाही कळून चुकलं आहे की, या पलीकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही", अशा शब्दात आमदार थोरवेंनी तटकरेंना लक्ष्य केले. 

"पराभव हा पराभव असतो. त्यामुळे तो शांतपणे स्वीकारा. ज्या ज्या ठिकाणी चुका झाल्या, त्याचे आत्मचिंतन करा. मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो", असेही थोरवे म्हणाले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण