शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात गणेशोत्सव खरेदीचा संडे मूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 02:52 IST

गणरायाच्या आगमनाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना वाढत्या महागाईमुळे बाजारामध्ये म्हणावी तशी खरेदीची धूम दिसून येत नव्हती.

- आविष्कार देसाई अलिबाग : गणरायाच्या आगमनाला अवघे तीनच दिवस शिल्लक असताना वाढत्या महागाईमुळे बाजारामध्ये म्हणावी तशी खरेदीची धूम दिसून येत नव्हती. पण गणपती आगमनापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रहिवाशांनी एकच गर्दी केली होती. यंदा बाप्पासाठी लागणाऱ्या पूजेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, फुले-हार, फळे यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.गणेशोत्सवाला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कोकणासह सर्वत्र बाप्पाचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. कोकणामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सवांची संख्या अधिक असते. दीड दिवसापासून ते २१ दिवसांपर्यंत मुक्कामाला येणाºया बाप्पासाठी मनोभावे जय्यत तयारी करण्यात गणेशभक्त कोणतीच कसूर करत नाहीत. मात्र यंदाच्या वर्षी बाप्पाचे लाड पुरवताना भक्तांच्या खिशाला चांगलीच चाट लागणार आहे. वाढत्या महागाईचा परिणाम हा त्यांच्या बजेटवर होणार आहे. मराठी माणूस हा मुळातच उत्सवप्रेमी असल्यामुळे जीवाचे रान करून तो बाप्पाच्या आगमनाची व त्यांच्या मुक्कामाच्या वेळी कोणतीच कमतरता राहणार नाही याची काळजी घेईल, असे काही गणेश भक्तांनी सांगितले.बाप्पाचे आगमन तीनच दिवसांवर येऊन ठेपले आहे, त्यामुळे रविवारी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले. थर्माकोलवर बंदी आल्याने सजावटीसाठी बाजारामध्ये जिवंत झाडे विकण्यासाठी उपलब्ध झाली आहेत, तसेच कागदी फुलेही आहेत. परंतु, त्यांच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. थर्माकोलच्या मखराला पर्याय म्हणून कागद आणि कापडापासून तयार केलेली मखरे बाजारात विक्रीसाठी आहेत.गणरायाच्या नियमित पूजेसाठी लागणारा कापूरही प्रचंड महागला आहे. ४०० रुपये किलोने मिळणारा कापूर आता तब्बल एक हजार २०० रुपयांवर गेला आहे. १५ रुपयांचा नारळ ३० रुपयांना मिळत आहे. अगरबत्तींच्या किमतीही सुमारे १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. धूपच्या किमतींनीही किलोमागे तीनशे रुपयांनी उभारी घेतली असल्याचे विक्रेते राहुल साष्टे यांनी सांगितले.बाप्पासाठी विविध फळांचा वापर केला जातो. त्यातील सफरचंद, केळी, पपई, चिकू, अननस, काकडी, डाळींब, द्राक्ष, संत्री आणि मोसंबी यांच्या किमतीही सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या असल्याचे दिसून येते.महाडमध्ये बाजारपेठ फुललीमहाड : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी महाड बाजारपेठ फुलून गेल्याचे दिसून आले. गणेश आरास सजावटीच्या साहित्यांसह रेडिमेड मखर, पूजेचे साहित्य, गणरायासाठी आकर्षक कंठ्या, कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. महाड बाजारपेठेतील सर्व दुकाने सजावटीच्या साहित्यासह अन्य सामानांनी सजली आहेत. यंदा महागाई गगनाला भिडली असली तरी गणेशोत्सव खरेदीवर त्याचा कसलाही परिणाम जाणवत नसल्याचे महाड बाजारपेठेतील गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल वापरावर यंदापासून बंदी असल्याने पुठ्ठा व कागदी मखरांना महाडमध्ये चांगली मागणी आहे.पोलिसांचा कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देणारमोहोपाडा : गणेशोत्सव सण हा धार्मिक भावनेने साजरा केला जातो. सणाला कोणतेही गालबोट लागू नये याकरिता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक-मालक आदींच्या उपस्थितीत सणाच्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले होते. त्यात पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्याची भूमिका मांडली.पेणमध्ये गौराईच्या २००० मूर्ती तयारपेण : बाप्पाच्या सुखद आगमनानंतर मांगल्यकारी कुटुंबवत्सलतेचा नजारा साजरा करण्याचा धम्माल सण म्हणजे गौरीचा. माहेरवाशीण गौराई धनधान्य समृद्धीचा वरदहस्त असल्याने कोकणात गौरीच्या आगमनाची तयारीही जोरदार सुरू आहे. पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये गौरीचे मुखवटे, पूर्ण मातीच्या गौरीच्या मूर्ती नखशिखांत सजल्या आहेत. गौरार्इंचे हे मनमोहक रुपडे येणाºया गणेशभक्तांना कार्यशाळांमध्ये आकर्षित करीत आहे. तब्बल २००० ते २५०० गौरी नखशिखांत रंगरंगोटी करून आपल्या भक्तगणांच्या इच्छित स्थळी जाण्यास सज्ज झाल्या आहेत.महामार्ग बहुतांशी खड्डेमुक्तनागोठणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्ग खड्डेमुक्त न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा उचलला जाईल असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित रस्ता ९० टक्के खड्डेमुक्त केला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटरचा बहुतांशी रस्ता खड्डेमय झाला होता. गणेशोत्सव जवळ येत असल्याने रस्ता सुधारला नाही, तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानुसार प्राधिकरणाने पनवेल - पेण - वडखळ - नागोठणे - वाकण - सुकेळी - कोलाड - इंदापूर या मार्गावरील जवळपास ९० टक्के खड्डे बुजवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव